आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांना भरली हुडहुडी:ओझरमध्ये तापमानाचा पारा 5.7 अंशावर; जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा पावसाळा ज्या पद्धतीने लांबला त्याच पद्धतीने हिवाळा हा पंधरा दिवस आधीच सुरू होऊन गेल्यावर्षीच्या तुलनेत महिनाभर आधीच नाशिक जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरून ओझर येथे 5.7 इतका तापमानाची नोंद झाली यामुळे नाशिक शहर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून दिसून येत आहे.

गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदाच्या हंगामातील नोव्हेंबर महिन्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद ओझर येथील एच.ए.एल येथिल एअर ट्राफिक कंट्रोल येथे सोमवारी सकाळी 6.45 वाजेच्यासुमारास 5.7 अंश इतकी तापमानाची नोंद झाली आहे. मागील दोन वर्षाच्या तुलनेत एक महिना आधीच तापमानाचा पारा घसरला

15 नोहेंबर 2020- 15 अंश

15 नोहेंबर 2021 - 13 अंश

15 नोहेंबर 2022 -5.7 अंश अशी नोंद झाली असून वाढलेल्या थंडी मुळे सर्व नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरवर्षी पंधरा डिसेंबर नंतर वाढणाऱ्या थंडीचा जोर 15 नोव्हेंबर नंतर वाढला असून येत्या काळात अशीच थंडी वाढत राहिली तर तापमान अजून खाली येण्याची शक्यता आहे वर्तवली जात आहे. नाशिक जिल्ह्यात दिवसागणिक तापमानाचा पारा अधिकाधिक खाली येत चालल्याने जनजीवन विस्कळीत होतानाच या कडाक्याच्या थंडीमुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पाल्यांचे शाळेत विद्यार्थ्यांना नेऊन घालण्यासाठी सकाळी हाल होत आहेत. प्रताप दाखवायला सुरुवात केली आहे. विशेषतः सध्याच्या कडाक्याच्या थंडीमुळे ओझर परिसरातील द्राक्ष बागांवर विपरीत परिणाम करण्यास सुरुवात केली आहे. निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसात तापमान खाली खाली येताना शुक्रवारपासून तापमान अधिकच खाली घसरल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोरील चिंता अधिकच वाढली आहे.

शेतकऱ्यांच्या अंगातही हुडहुडी भरली आहे. थंडीमुळे द्राक्षघडांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन शेतकरी बागांवर बुरशीनाशक रासायनिक औषधांची फवारणी करताना दिसत आहेत. एकंदरीत सध्याच्या थंडीने द्राक्षबागा संकटात सापडल्या असून, तापमानाचा पारा येत्या काही दिवसात अधिकच खाली घसरला गेल्यास शेतकऱ्यांसमोरचं संकट अधिकच वाढणार आहे.

बातम्या आणखी आहेत...