आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गलथान कारभाराने संताप:नाशिककरांचा ‘स्मार्ट सिटी चले जाव’ नारा ; आंदाेलनाद्वारे अधिकाऱ्यांना विचारणार जाब

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाेदावरीच्या घाट परसिरात सुशाेभीकरणाच्या नावाखाली गाेदेचा इतिहासच पुसण्याचे काम स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशनच्या वतीने केले जात असल्याचा नाशिककरांचा आक्षेप आहे. स्मार्ट सिटीच्या या गलथान कारभाराबाबत अधिकाऱ्यंाना जाब विचारण्यासाठी नाशिककर आता रस्त्यावर उतरत ‘स्मार्ट सिटी चले जाव’ आंदाेलन करणार आहेत. याबाबत बैठक घेऊन आंदाेलनाची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती गाेदाप्रेमी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी दिली.

नाशिक म्युनसििपल स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशनच्या वतीने शहरात विविध कामे केली जात आहे. या कामासाठी काही महिन्यांपासून रस्ते खाेदले आहेत. यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. गाेदावरी नदी परसिरात सुशाेभीकरणाच्या नावाखाली स्मार्ट सिटीकडून केेल्या जाणाऱ्या कामाबाबत परसिरातील नागरिकांसह विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी तक्रारी करूनही स्मार्ट सिटीकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीच्या विराेधात माेर्चा काढण्याची तयारी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...