आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवंत देखावा सादर:नाशिककरांनी घेतली सीतास्वयंवराची अनुभूती ; संभाजी स्टेडियममध्ये रामकथेचे आयोजन

सिडकोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभू रामचंद्रांच्या जन्मापासून तर सीतास्वयंवरापर्यंतची कथा व त्याचा जिवंत देखाव्याची अनुभूती भक्तांनी घेतली. निमित्त हाेते राजे संभाजी स्टेडियम येथे सुरू असलेल्या रामभक्ती कथासाराचे.स्वामी समर्थ मंडळ, संत शक्ती धाम व लोकनेता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रामायणाचार्य समाधान शर्मा महाराज यांच्या रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कलाकरांनी सीतास्वयंवराचा जिवंत देखावा सादर केला. यावेळी कलाकारांनी सादर केलेल्या देखाव्यामुळे भाविकांना जणू प्रत्यक्ष डाेळ्यासमाेर रामायण सुरू असल्याचा अनुभव अाला.

एकीकडे कथा आणि दुसरीकडे देखावा यामुळे भक्तांनी वेगळीच अनुभूती घेतली. यात प्रभू रामचंद्रांच्या जन्मापासून ते सीतास्वयंवराचा प्रवास महाराजांनी उलगडला. वशिष्ठानंतर विद्येचे आकलन करत, विद्या विश्वामित्रांकडून ग्रहण केली व यज्ञ रक्षण केल्याचे शर्मा महाराजांनी सांगितले. अनेक घटना सांगताना संगीताच्या तालावर भक्तांनी ठेका धरला. दिवाळी झाल्यानंतर दिवाळी साजरी झाल्याचे उपस्थितांनी सांगितले. यावेळी हजारो भक्तांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...