आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्य रस्त्यावर भर पावसातच खड्डे बुजवण्यासाठी डांबरीकरण:नाशिकच्या सिटी सेंटर मॉल चौकात ठेकेदाराकडून गैरप्रकार

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बहूतांशी मुख्य रस्ते, चाैकांवर पडलेल्या खड‌्डयांमुळे राेजच अपघाताच्या घटना घडत असताना सर्वच राजकीय पक्ष, संघटना व नागरिकांकडून प्रशासनास धारेवर धरले जात असताना मनपाकडून रस्ते बनविणाऱ्या ठेकेदारांकडूनच खड्डे बुजविण्याचा धडका लावला आहे. मात्र, हे खड्डे बुजतानाही नित्कृष्ट साहित्याचा वापर केला जात असताना मंगळवारी (दि.6) रात्री 10 ते 11 वाजेच्या सुमारास भर पावसातच सिटी सेंटर माॅल चाैकात खड्डे बुजविण्यासाठी सर्रासपणे डांबर ओतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे.

शहरातील सर्वच भागातील रस्ते पाऊसामुळे उखडले असून रस्त्यात खड्डे नाही तर खड्डयातच रस्ते गेल्याचे चित्र दिसून येत आहे. याप्रकाराने सामान्य वाहनधारकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. मनपाचा गुणवत्ता नियंत्रकासह ठेकेदाराच्या नित्कृष्ट कामाचे पितळ उघडे झाले आहे. यावर मनपा आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी स्वत: गुणवत्ता नियंत्रकावरच खह‌्डयांचे खापर फाेडले आहे. गणेश विसर्जनाच्या पूर्वी शहरातील सर्व खड्डे मुक्त रस्ते करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले हाेते. त्याची अंमलबजावणी करताना ऐवढी तत्परता दाखविली जात आहे की, खड्डयाच्या जागेवरील इतर दगड, माती बाजूला न करता वरून मुरूम टाकला जात आहे. तर काही जागेवर डांबराचा थर टाकून आेबडधाेबड पॅच मारले जात आहे. तसाच प्रकार मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आढळून आला. रात्री जोरदार पाऊस सुरू असताना सिटी सेंटर मॉल चौकात संबंधित ठेकेदाराकडून पावसाच्या पाण्यातच सर्रासपणे डांबर ओतून खड्डे बुजविण्यात एकप्रकारे पराक्रमच करण्यात आला, काही जागरून वाहनधारकांनी त्यांना पावसात डांबर टिकेल का ? असा प्रश्न करताच उपस्थित सुपरवायझरने आम्हाला आदेश दिले आहेत, डांबर ओता, तसे आम्ही करताेय, हे बाेलून निघून गेला. याचठिकाणी दुसऱ्या दिवशी बघितले असता अर्ध्या अर्ध्या भागात खड्डे आणि अर्ध्या भागात डांबर असे चित्र पाहायला मिळाले. पावसात डांबरीकरणाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. याबाबत मनपा आयुक्त नेमकी संबंधित ठेकेदारांविराेधात काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...