आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नाशिकच्या हबीबची ‘मिस्टर वर्ल्ड’साठी निवड

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या शरीरसाैष्ठव स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील मिस्टर इंडिया स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या नाशिकच्या २९ वर्षीय हबीब सय्यद याची मालदिव येथे होणाऱ्या मिस्टर वर्ल्ड स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. जुलैमध्ये होणाऱ्या मिस्टर वर्ल्ड स्पर्धेचे सुवर्ण पदक जिंकण्याचे ध्येय असल्याचे त्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या शरीरसाैष्ठव स्पर्धेत हबीब सय्यदने राैप्यपदक पटकावले. या स्पर्धेत हबीब सय्यदने ८० ते ८५ किलो वजनी गटात देशात दुसरा क्रमांक पटकावला. हबीबने दोन वर्षांत राज्यस्तरीय स्पर्धेत सातत्याने सुवर्ण पदक मिळवत नाशिकचे नाव उंचावले आहे. तसेच, मिस्टर इंडिया या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावल्याने त्याची मालदिव येथे होणाऱ्या मिस्टर वर्ल्ड स्पर्धेसाठी ही निवड झाली आहे.

२०२२ मध्ये मिस्टर इंडिया
हबीबला २०१७ साली प्रथमच ‘नाशिक श्री’ होण्याचा मान मिळाला होता. त्यानंतर सलग तीन वर्षे ‘मिस्टर नॉर्थ महाराष्ट्र’ शरीरसाैष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक त्याने मिळवले. २०२० साली महाराष्ट्र श्री स्पर्धेत कांस्य तर २०२२ मध्ये सुवर्णपदक मिळविले. याच वर्षी पुन्हा ‘मिस्टर नॉर्थ महाराष्ट्र’ स्पर्धेत ‘मिस्टर मस्क्युलर टायटल’ या स्पर्धेत प्रथम व त्यानंतर मिस्टर इंडिया हा दुसऱ्या क्रमांकाचा किताब पटकावला आहे.

आता ध्येय मिस्टर वर्ल्ड
मिस्टर इंडिया स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावल्यानंतर माझी निवड मालदिव येथे जुलैमध्ये होणाऱ्या मिस्टर वर्ल्ड स्पर्धेसाठी झालेली आहे. या स्पर्धेसाठी दररोज सहा तास सराव करत आहे. माझे ध्येय आता ‘मिस्टर वर्ल्ड’ किताब देशात आणणे हे आहे. - हबीब सय्यद, मिस्टर इंडिया रनरअप

बातम्या आणखी आहेत...