आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:यूथ कार्निव्हलच्या चित्रकला स्पर्धेत नाशिकच्या नीलेश भदाळे यांचे यश

नाशिक8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महाराष्ट्र यूथ कार्निव्हल (मायोका) या राज्यस्तरीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपक्रमांतर्गत नृत्य, गायन, मॉडेलिंग, चित्रकला या प्रकारांच्या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पार पडली. प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या स्पर्धकांची विभागस्तरावर उपांत्य फेरी घेण्यात आली.

उत्तर महाराष्ट्र (नाशिक) विभागाच्या उपांत्य फेरीत नाशिकचे चित्रकार नीलेश भदाळे यांची अंतिम फेरीत निवड झाली असून त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते ११ हजारांचा धनादेश व प्रमाणापत्र देऊन गौरविण्यात आले.