आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशाला गवसणी:जेईई अॅडव्हान्समध्ये नाशिकच्या रयानला आॅल इंडिया रँक २८४

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी, मुंबई)च्या वतीने घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई अॅडव्हान्स या संयुक्त प्रवेश परीक्षेचा निकाल रविवारी ( दि. ११) जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकच्या रयान अझिम या विद्यार्थ्याने आॅल इंडिया रँकने २८४ पटकावत उत्तुंग यशाला गवसणी घातली आहे.

नाशिकच्या अनन्या बघेल (५८३), सर्वेश बहेती (६५६), आदित्य मुंदडा (६९९), तन्मय कुलकर्णी (७९१), प्रथमेश बाविस्कर (९७८) या विद्यार्थ्यांनी पहिल्या एक हजारच्या आत आॅल इंडिया रँक पटकावली आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी आॅल इंडिया रँकमध्ये स्थान पटकावले आहेत. jeeadv.ac.in या संकेतस्थळावरून विद्यार्थी स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. निकालासोबत जेईई अॅडव्हान्स २०२२ ची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली. जेईई मेन्स परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची जेईई अॅडव्हान्स परीक्षा २८ आॅगस्टला घेण्यात आली. देशातील २२५ परीक्षा शहरांमध्ये दोन सत्रामध्ये ही घेण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...