आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुली व महिलांचा संघ विजेता:नाशिकच्या टेबल टेनिस संघाला दोन सुवर्ण

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालेवाडी (पुणे) येथे सुरू असलेल्या ५१ व्या आंतरजिल्हा व ८४ व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या संघाने १९ वर्षांखालील मुलींचा गट व महिला गटाचे विजेतेपद मिळवून दोन सुवर्णपदकांचे मानकरी होण्याचा मान मिळविला. मुंबई-पुण्याची मक्तेदारी मोडीत काढत नाशिकच्या महिला व मुलींच्या दोन्ही संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आंतरराष्ट्रीय मानांकन असणाऱ्या तनिशा कोटेचा व सायली वाणी व जोडीला मिताली पूरकर हिच्या मदतीने त्यांनी ही कामगिरी करून नाशिकला प्रथमच दोन सांघिक गटांच्या विजेतेपदाचा मान मिळवून दिला.

१९ वर्षांखालील मुलींच्या गटाच्या अंतिम फेरीत नाशिकच्या संघाची गाठ मंुबईच्या द सबर्बन टेबल टेनिस असोसिएशनच्या संघाशी पडली. अत्यंत अटीअटीच्या झालेल्या सामन्यात त्यांचा ३-२ असा पराभव करून नाशिक संघाने सुवर्णपदक पटकावले.

नाशिकच्या तनिशाने पहिल्या सामन्यात टीएसटीटीएच्या अनन्या चांदेचा ३-० असा पराभव करून आपल्या संघाला १-० ने आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात सायलीने संपदा भिवणकर हिचा ३-० ने पराभव करून नाशिकला २-० अशी आघाडी मिळवून दिली. टीएसटीटीए मुंबईच्या मुक्ता दळवी हिने ३-२ असा पराभव करून आपल्या संघाला एक सामना जिंकून १-२ अशी स्थिती निर्माण केली. चौथ्या सामन्यात मुंबई सबर्बनच्या संपदा भिवणकरने नाशिकच्या तनिशा कोटेचा हिचा १४-१२, ४-११, ११-२, १३-११ असा ३-१ ने पराभव करत आपल्या संघाला २-२ अशी बरोबरी साधून दिली.

सायलीने टीएसटीटीए मुंबईच्या अनन्या चांदेचा असा ३-२ पराभव करून १९ वर्षांखालील मुलींच्या गटाचे सुवर्णपदक नाशिकला मिळवून दिले. महिला गटाच्या अंतिम फेरीत नाशिकच्या संघाची गाठ ठाण्याच्या महिला संघाशी पडली. तनिशा कोटेचा व सायली वाणी यांनी पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करत महिला गटाचे अजिंक्यपद मिळवून देत दुसरे सुवर्ण नाशिकला मिळवून दिले.

नाशिकला प्रथमच दाेन सुवर्णपदक पटकावण्याचा मान
नाशिकच्या टेबल टेनिस खेळाच्या इतिहासात प्रथमच दोन सुवर्णपदक मिळवण्याचा मान मिळाला. नाशिकच्या महिला संघात जान्हवी कळसेकर, अनन्या फडके तसेच १९ वर्षांखालील मुलींच्या संघात अनन्या फडके यांचाही समावेश होता. नाशिकच्या पुरुष संघानेही या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. या संघात कुशल चोपडा, अजिंक्य शिंत्रे, पुनित देसाई व धनंजय बर्वे यांचा समावेश होता. बक्षीस वितरण राज्याचे क्रीडा संचालक सुहास दिवसे यांच्या हस्ते पार पडला.

बातम्या आणखी आहेत...