आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेलो इंडिया युथ गेम्स:नाशिकच्या तनिशा कोटेचाला मुलींच्या एकेरीत सुवर्ण पदक अन् दुहेरीत रजत पदक

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेलो इंडिया युथ गेम्स 2022 स्पर्धेत टेबल टेनिस मधे नाशिकच्या तनिशा कोटेचा हीने एक सुवर्ण व एक रौप्य पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली.

इन्दोर येथे चालू असलेल्या स्पर्धेत मुलींच्या एकेरीत तनिशाने उपांत्यपूर्व फेरीत तमिळनाडूच्या नेहल व्यंकटस्वामी हीचा 4-0 असा सहज पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत तीची गाठ पडली हरियाणाच्या प्रितोकी चक्रवर्ती बरोबर अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात तनिशा हीने पहिला गेम 12-10 असा जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली. परंतु पुढच्या दोन गेम प्रोतिकाने 11-6 व 11-5 असे जिंकून 2-1 आघाडी घेतली. परंतु पुढचा गेम 12-10 जिंकून बरोबरी साधली. पाचव्या गेम मधे शेवटच्या क्षणा पर्यन्त झालेल्या लढतीत प्रोतिकाने 11-13 असा जिंकून आपली 3-2 अशी आघाडी घेतली. परंतु शेवटच्या दोन गेम मधे तनिशाने बैंकहैंड फोरहैण्ड तसेच टॉस्पिन फटक्यानचा वापर करून 11-8 व 11-9 जिंकून 4-3 असा सामना जिंकून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.

अंतिम फेरीत तीची गांठ पडली दिल्ली च्या लक्षीता नारंग बरोबर लक्षीता हीने अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी उपांत्य फेरीत कर्नाटकच्या यशस्विनी घोरपड़े हीचा 4-0 असा सहज पराभव केला. तनिशाने अंतिम फेरीत दिल्ली च्या लक्षिका नारंगचा 4-2 असा पराभव करून सुवर्ण पदक आपल्या नावे केले. पहीले तीन गेम 11-4, 14-12 व 11-6 असे जिंकून 3-0 आघाडी घेतली. उत्कृष्ट फोरहैण्ड व बैकहैंड फटक्यानचा वापर करून तनिशा विजयाकडे आपली वाटचाल सुरु ठेवली. चौथ्या गेम मधे 9-6 अशी आघाडी घेतलेल्या तनिशाचा 4-0 असा विजय निश्चित असतांना लक्षिकाने तीन सलग पॉइंट घेत 9-9 अशी बरोबरी करत हा सामना 11-9 असा जिंकून 3-1 करून सामन्यातली चुरस कायम राखली. पाचव्या गेम अत्यंत चुरशीचा होऊन त्यातही लक्षिकाने तो गेम 12-10 जिंकून सामन्यात 3-2 अशी बरोबरी करण्याच्या दृष्टीने आपली वाटचाल चालू ठेवली. सहाव्या गेम मधे सुरवाती पासून आपले वर्चस्व ठेवत 11-4 जिंकून सवर्ण पदक आपल्या नावे केले.

मुलींच्या दुहेरी मधे तनिशा कोटेचाने मुम्बई सबर्बनच्या रीशा मीरचंदानी हीच्या साथीने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत त्यांची गांठ पडली ती महाराष्ट्राच्याच पुण्याच्या पृथा वर्टिकर व तीची जोडीदार नागपूरची जेनिफर वर्गीस यांच्या बरोबर. अंतिम फेरीच्या सामन्यात वर्टिकर व जेनिफर वर्गीस हीने तनिशा कोटेचा आणि रीशा मीरचंदानीचा ३-० असा पराभव केला. तानिशाला यामुळे रजत पदक मिळाले. यशाबद्दल नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, टेबल टेनिस फेडरेशनचे सेक्रेटरी जनरल कमलेश मेहता, उपाध्यक्ष शेखर भंडारी अभिनंदन केले

बातम्या आणखी आहेत...