आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिकच्या निफाड तालुक्यात बिबट्याच्या बछड्यासोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील काही तरुणांनी एका ऊसाच्या शेतात अडकलेल्या बिबट्याच्या पिल्लाला पकडले आणि त्याच्यासोबत सेल्फी घेतली. या दरम्यान काहींनी त्याला आपल्या कडेवर घेतले, तर कुणी हात तर कुणी पाय ओढून त्याच्यासोबत फोटो काढले. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, यानंतर मुक्या प्राण्यासोबत गैरवर्तन करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
नाशिकचा ग्रामीण निफाड परिसर ऊसाच्या शेतांसाठी ओळखला जातो. येथील अनेक गावात बिबट्यांचे दर्शन होत असल्याच्या बातम्या येत असताता. बिबटे ग्रामस्थांच्या नजरेतून वाचण्यासाठी ऊसाच्या शेतात दडून बसतात आणि संधी मिळताचा ग्रामस्थांवर हल्ला करतात. दरम्यान एक बिबट्याचा बछडा शेतात लपल्याची माहिती मिळाली, त्यानंतर कुरूदगांवच्या ग्रामस्थांनी शेतात घेराव घातला आणि अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर त्याला पकडले. त्यानंतर
वनविभागाच्या पथकाने या बछड्याला वाचवले
दुसरीकडे चार-पाच महिन्यांच्या बछड्याला पकडल्यानंतर गावकऱ्यांनी न घाबरता त्याच्यासोबत सेल्फी घेण्यास सुरुवात केली. या दरम्यान काही तरुणांनी व्हिडिओ देखील बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान गावातील काही जागरूक ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासन आणि वन विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बछड्याला आपल्यासोबत घेऊन गेले.
बिबट्या एक संरक्षित वर्गातील प्राणी आहे आणि त्याच्यासोबत असे कृत्य करणे ग्रामस्थांना महागात पडू शकते. मात्र, अद्यापपर्यंत वनविभागाकडून कोणताही तक्रार करण्यात आली नाही. परंतु व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.