आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकचा देशपातळीवर सन्मान:ईट राईट स्पर्धेत देशपातळीवर पुरस्कार, अन्न प्रशासन विभागाची अभिमानास्पद कामगिरी

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अन्न सुरक्षा प्राधिकरणातर्फे अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या अंमलबजावणीसह ग्राहक जागृती, ईट राईट कॅम्पस, धार्मिक स्थळांमधील प्रसादाची स्वच्छता अशा निकषांवर घेतलेल्या स्पर्धेत देशपातळीवरील पुरस्कार नाशिकला मिळाला आहे.

या स्पर्धेत देशातील उत्तम कामगिरी करणाऱ्या 75 जिल्ह्यांची निवड करण्यात आली हाेती. राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त परिमल सिंह यांनी पुरस्कार स्विकारला.

अन्न सुरक्षा दिनानिमित्त 7 जून राेजी दिल्लीत आयाेजित कार्यक्रमात केंद्रीय आराेग्य मंत्री मनसुख मंडविया यांच्या हस्ते महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त परिमल सिंह यांना प्रशस्तीपत्रक देऊन नाशिकचा बहुमान करण्यात आला.

नाशिकच्या अन्न प्रशासन विभागाने सर्वच स्तरावर चांगली कामगिरी केली. दैनंदिन अंमलबजावणीसह महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कॅम्पस, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ इपिराॅक मिनमिनिंग इन्स्टीट्यूट सातपूर, एसएमबीटी संस्था घाेटी, सपकाळ नाॅलेज हब महिरावणी, दिलासा फाउंडेशन या ठिकाणी क्लिन स्ट्रीट फुड हबचा दर्जा मिळवून दिला.

जिल्ह्यातील सागर स्विट्स व त्यांच्या चार आस्थापना, गणेश स्विट्स, आराधना स्विट्स, लाॅर्ड फुड प्राॅडक्ट्स, तुषार फुड हब, सत्यम स्विट्स, मधुर स्विट्स, या आस्थापनांना हायजीन रेटींगचा दर्जा प्राप्त करून त्याबाबतचे प्रशस्तीपत्रक देण्यात आले. जिल्ह्याला हा बहुमान मिळवून देण्यासाठी सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त गणेश परळीकर व विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, याेगेश देशमुख‌, प्रमाेद पाटील, संदीप देवरे, गाेपाल कासार, दिनेश तांबाेळी यांनी कामकाज पाहीले.

बातम्या आणखी आहेत...