आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानांकन:नॅशनल बोर्ड ऑफ अंँक्रेडिटेशन; के. के. वाघ अभियांत्रिकीच्या पाच विभागांना एनबीए मानांकन

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

के. के. वाघ शिक्षण संस्था संचालित के. के. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन महाविद्यालयाच्या पाच विभागास नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन (एनबीए) या राष्ट्रीय संस्थेकडून २०२२-२३ ते २०२४-२५ या पुढील तीन शैक्षणिक वर्षांसाठी एनबीए मानांकन मिळाल्याची माहिती प्राचार्य प्रा. के. नि. नांदुरकर यांनी दिली. महाविद्यालयाच्या या पाच विभागांमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अॅण्ड टेलिकम्युनिकेशन, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, केमिकल इंजिनिअरिंग या विभागांचा समावेश आहे.

महाविद्यालयाचे मॅकेनिकल इंजिनिअरिंग आणि मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए) विभाग यांनाही एनबीए मानांकन मिळालेले आहेत. महाविद्यालयाच्या ८ विभागांना यापूर्वी २०१९-२० ते २०२१-२२ ही तीन शैक्षणिक वर्षासाठी एनबीए मानांकित होते. त्याचप्रमाणे, अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅकची ‘अ’ श्रेणी प्राप्त आहे. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे महाविद्यालयास १० वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये नाशिक विभागात के. के. वाघ अभियांत्रिकी हे पहिले स्वायत्त महाविद्यालय असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...