आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा तलवारबाजी असोसिएशन, डीएसफ व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने विभागीय क्रीडा संकुल येथे मिनी गटाच्या 11व्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत मुलींच्या १० वर्षे वयोगटात उत्तराखंडच्या प्रहम्या कोठारीने अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या श्रेया मुमला १५-०७ असे पराभूत करून विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राच्या श्रेया मुमला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. उपांत्य लढतीत पराभूत झालेल्या महाराष्ट्राच्या अनया वरखडे आणि तमिळनाडूच्या अनुश्री यांना सयुंक्त तिसरा क्रमांक मिळाला.
स्पर्धेमध्ये भारतातील २७ राज्यांचे ७८२ खेळाडू सहभागी झाले होते. उदघाटनानंतर स्पर्धांना सुरवात करण्यात आली. विभागाच्या क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, छत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, फेन्सिंग फेडेरेशनचे सहसचिव डॉ. उदय डोंगरे, फेडेरेशनचे सदस्य नागेश्वर राव, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक आनंद खरे यादी यावेळी उपस्थित होते. स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रकाश काटुळे, डॉ. पांडुरंग रणमाळ आदींची कमिटी कार्यरत आहे.
विजेते (मुली - १० वर्षे वयोगट)
१) प्रहाम्या कोठारी (उत्तराखंड) - प्रथम
२) श्रेया मूम (महाराष्ट्र) द्वितीय
३) अनुष्री (तामिळनाडू) आणि अनाया वरखडे (महाराष्ट्र) संयुक्त तिसरा क्रमांक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.