आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि फेन्सिंग फेडेरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली 18 वर्षे वयोगटाच्या 17 व्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
या स्पर्धेचे उद्घाटन अखिल भारतीय मराठा महासंघाचे सचिव प्रमोद जाधव, कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांच्या हस्ते आणि मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत बनकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मोगल, छत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे, फेन्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव तथा महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव डॉ. उदय डोंगरे, क्रीडा संघटक अशोक दुधारे, दत्ता गलाले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व जिल्हयाचे सचिव, पदाधीकारी, प्रतिनिधि यांनाही सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलतांना प्रमोद जाधव यांनी सांगितले की खेळाडूंनी मेहनत केल्यास त्यांना यश जरुर मिळते. त्यामुळे खेळाडूनी या संधीचा फायदा घेऊन भारताचे नांव उज्वल करावे असे सांगितले. यावेळी केशवअण्णा पाटील यांनिहीही खेळाडूंना शुभेच्या दिल्या. या कार्यक्रमाचे अशोक दुधारे यांनी केले तर सूत्रसंचालन उदय खरे यांनी केले. 11 ते 14 डिसेंबर, 2022 दरम्यान आयोजित या स्पर्धेत संपूर्ण भारतातून 32 राज्यांचे 1478 खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये यजमान महाराष्ट्रासह दिल्ली, पश्चिम बंगाल, एस. एस. सि. बी., केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, छत्तीसगड, पोंडेचरी, गुजराथ, दिव-दमण, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, ओरिसा, मिझोराम, मणीपुर, चंदीगड, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, तेलंगणा, झारखंड, नागालँड, चंदीगड, गोवा, मिझोराम, त्रिपुरा, पोंडेचरी याचा समावेश आहे.
आजच्या स्पर्धेचे निकाल
मुले वैयक्तिक सॅबर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.