आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • National Folk Theater And Folk Dance Competition Awarded To Students Of Government Residential Schools Of Social Welfare Department; Will Lead Maharashtra

राष्ट्रीय लोकनाट्य व लोकनृत्य स्पर्धा:समाज कल्याण विभागाच्या शासकिय निवासी शाळातील विद्यार्थ्यांना बहुमान; महाराष्ट्राचे करणार नेतृत्व

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या पाटोदा जि.बीड येथील शासकिय निवासी शाळातील विद्यार्थीनी लोकनाट्य व लोकनृत्य स्पर्धेत चांगली कामगिरी करुन बहुमान प्राप्त केला आहे, त्यातुनच राष्ट्रीय लोकनाट्य व लोकनृत्य स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी या विद्यार्थाना मिळाल्याने समाज कल्याण विभागाच्या या शासकिय निवासी शाळाच्या विद्यार्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) पुणे या ठिकाणी राष्ट्रीय लोकसंख्या विभागामार्फत दरवर्षी लोकनाट्य व लोकनृत्य राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्याअंतर्गत चालु वर्षी दिनाक दि. 4 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात आले होते. यामध्ये विविध ट्प्पे असुन तालुका स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत निवड केले जाते. प्रत्येक स्तरावर प्रथम येणारा संघ पुढील स्तरासाठी पात्र असतो. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक विभागातून लोकनृत्य व लोकनाट्य यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे 16 संघ सहभागी झाले होते. यामध्ये मुलींची शासकिय निवासी शाळा पाटोदा (जि. बीड) या शाळेच्या लोकनाट्य व लोकनृत्य या दोन्ही संघाचा समावेश होता.

शाळेच्या सहा शिक्षिका श्रीमती चव्हाण बी एस यांनी मुलींची शारीरीक, मानसिक, भावणीक व लैंगीक सुरक्षा या विषयावर लिहलेल्या लोकनाट्यास प्रथम क्रमांक मिळाला तसेच लोकनृत्य गटामध्ये सुद्धा श्रीमती चव्हाण बी एस मार्गदर्शित पर्यावरण रक्षण या विषयावर आधारीत असणाऱ्या गोंड आदिवासी जातीच्या नृत्यास राज्यातून सर्वप्रथम क्रमांक मिळाला. या विजेत्या संघाला राष्ट्रीय स्तरावर लोकनाट्य व लोकनृत्य स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

सदर स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम SCERT च्या उपसंचालिका श्रीम बेलसरे मैडम यांच्या हस्ते नुकताच पार पडला.शाळेच्या यशासाठी सहमार्गदर्शक श्री तरकसे सर व श्री तांबे सर (मुख्याध्यापक), श्रीम तांदळे मॅडम ,श्री गायके , श्री दराडे सर , जोगी मॅडम, जावळे सर यांनी विशेष मेहनत घेतली तसेच या यशामध्ये प्रादेशिक उपायुक्त मा. जलिल शेख, सहाय्यक आयुक्त मा. बलभिम शिदे यांच्या मार्गदर्शन लाभले आहे.

या विजेत्या संघाला राष्ट्रीय स्तरावर लोकनाटय व लोकनृत्य स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झालेबदद्ल राज्याचे समाज कल्याण आयुक्त मा डाँ प्रशांत नारनवरे , यांनी नुकताच सदर शाळेच्या दोन्ही संघाचे व शिक्षकांचे विशेष कौतुक व सन्मान केला आहे. व राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघास शुभेच्छा देऊन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी .श्री भारत केंद्रे सहआयुक्त, उपायुक्त विजयकुमार गायकवाड, श्रीम बंडगर मॅडम, श्री हरिष डोंगरे तसेच आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...