आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 वर्षांखालील राज्यस्तरीय खो खो स्पर्धा:नाशिकच्या दोन्ही संघाची विजयी सलामी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय़, नाशिक जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नाशिक जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 17 वर्षा खालील राज्य स्तरीय शालेय खो खो स्पर्धेचे आयोजन पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडीयम येथे करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात प्रथमच शालेय खो खो स्पर्धेचे आयोजन मॅट वर करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील आठ संघ सहभागी झाले आहेत. नाशिकच्या मुलींच्या संघाने लातूर विभागाचा एकतर्फी सामन्यात 12 विरूध्द 5 असा एक डाव आणि सात गुणांनी पराभव केला तर मुलांच्या सामन्यात नाशिकने मुंबई विभागाचा पराभव करुन पुढील फेरीत दिमाखात प्रवेश केला.

या स्पर्धेचे उद्घाटन शिव छत्रपती राज्य पुरस्कार विजेते नरेंद्र छाजेड, साहेबराव पाटील, नाशिक विभागाच्या क्रीडा उप संचालक सूनंदा पाटील, माजी नगरसेवक रुची कुंभारकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, नाशिक जिल्हा खो खो असो. चे कार्याध्यक्ष आनंद गारंमपल्ली, गुरूदत्त चव्हाण आदीच्या उपस्थित करण्यात आले. अविनाश टिळे यांनी ़प्रास्ताविकात महाराष्ट्रात प्रथमच शालेय खो खो स्पर्धा ह्या मॅटवर आयोजीत करण्या मागची भूमिका विषद केली.

नाशिक जिल्हा खो खो असोसिएशन संचलित निवासी प्रबोधिनीच्या वृषाली भोये, निशा वैजल, कौसल्या पवार, सोनाली पवार, ताई पवार, सुषमा चौधरी, सरीता दिवा, मनिषा पडेर, दिदी ठाकरे, रोहिणी भवर, यांचा व राष्ट्रीय खेळाडू गौरव बेंडकोळी, दिलिप खांडवी,चंदु चावरे , आणि आकाश चौधरी अशा 14 सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंचा स्मृतीचिन्हआणि गुलाब पुष्प देऊन त्यांना गौरविण्यात आले. सकाळच्या सत्रात उप उपांत्य पूर्व फेरीचे दोन्ही गटात प्रत्येकी चार असे एकुण आठ सामने पार पडले.

नाशिकच्या मुलींच्या संघाने लातूर विभागाचा एकतर्फी सामन्यात तर मुलांच्या सामन्यात नाशिकने मुंबई विभागाचा पराभव करुन पुढील फेरीत दिमाखात प्रवेश केला. पाहिल्या डावात 11 विरुध्द 9 अशी दोन गुणांची आघाडी नाशिक संघाकडे होती व अखेर तिच निर्णायक ठरली.

दुसऱ्या डावात मुंबई विभागाने नाशिकचे सात गडी बाद करुन नाशिक पुढे विजयासाठी सहा गड्यांचे सोपे आव्हान ठेवले. कर्णधार चिंतामण चौधरी, कल्पेश सहारे, चेतन चौधरी आणि किरण जाधव यांच्या अष्टपैलू कामगिरी मुळे नाशिक संघाचा सहज विजय झाला. अन्य सामन्यात मुलांमध्ये लातूर विभागाने पुणे विभागाचा, औरंगाबाद संघाने नागपूर विभागाचा, तर मुलींच्या सामन्यात मुंबईने औरंगाबादचा तर पुणे विभागाने अमरावती विभागाचा पराभव करुन पुढील फेरीत प्रवेश केला.

बातम्या आणखी आहेत...