आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा:नाशिकच्या तनिशा कोटेचा, कुशल चोपडा अन् सायली वाणी यांची राज्य संघात निवड

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई येथे 8 ते 16 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी 17, 19 व महिला अश्या तीन गटात तनिशा कोटेचा हिची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. तीन संघाचे प्रतिनिधित्व करणारी उत्तर महाराष्ट्रातील ती पहिली महिला टेबल टेनिस खेळाडू असून 19 वर्षाखालील मुलींच्या संघाचे ती नेतृत्व करणार आहे ती भारतातील 19 वर्षाखालील गटात तीसरी तर 17 वर्षाखालील गटात 4 मानांकित खेळाडू आहे. तनिशा हीला आंतराराष्ट्रीय स्तरावर 17 वर्षाखालील गटात सतरावे तर 19 वर्षाखालील गटात सदोतीसावे मानांकन आहे. नुकतीच खेलो इंडिया स्पर्धेसाठीही तीची निवड झाली होती तिथेही तिने सुवर्ण पदक पटकावले.

याशिवाय कुशल चोपडाची 17 व 19 वर्षाखालील मुलांच्या या दोन संघात निवड झाली तसेच 17 वर्षाखालील मुलांच्या संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली आहे. त्याला आता 17 वर्षाखालील मुलांच्या गटात तीसरे राष्ट्रीय मानांकन आहे. सायली वाणी हिचीही 19 वर्षाखालील मुलींच्या महाराष्ट्र संघात निवड झाली. या गटात तीला तीसरे राष्ट्रीय मानांकन आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर 17 वर्षाखालील गटात तीला तेहतीसावे मानांकन आहे. नासिकचे हे तिन्ही खेळाडू राष्ट्रीय स्तरावर पहिल्या चार मानांकनांमध्ये आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत त्यांच्या कडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याबद्दल त्यांचे कोच जय मोडक यांनी मत व्यक्त केले.

त्यांच्या या निवडी बद्दल नासिक महागरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तसेच तनिशा कोटेचा हीने नुकत्याच इन्दोर येथे पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार या खेळाडूंना नासिक मनपा तसेच निरनिराळ्या औद्योगिक क्षेत्रातील आस्थापना यांचे कडूनही जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड सचिव राजेश भरवीरकर, संजय कोटेचा, कोच जय मोडक आदि याप्रसंगी उपस्थित होते. यांच्या या निवडीबद्दल संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष शेखर भंडारी, मिलिंद कचोळे सचिव राजेश भरवीरकर, कोशाध्यक्ष अभीषेक छाजेड, संजय वसंत, अलीअसगर आदमजी, सतीश पटेल,. अलका कुलकर्णी, पियुष चोपडा, राजेश वाणी आदिनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...