आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:जातीयता संपविण्यासाठी राष्ट्रवादी विचारांचे कार्यकर्ते तयार करावे; विहीतगावच्या बैठकीत रंजन ठाकरे यांचे आवाहन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या जातीयवादी विचारांच्या पक्षामुळे कार्यकर्त्यांचे विचार त्याच दृष्टीने होत आहे. त्यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण होत आहे. ही बदलण्यासाठी सर्वसमावेश विचारांचे कार्यकर्ते व सोबतच राष्ट्रवादीच्या विचाराचे कार्यकर्ते वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केले.विहीतगाव येथे शनिवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमा अंतर्गत बैठक झाली. यावेळी ठाकरे बोलत होते,

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आता घरगुती गॅस देखील हजार रुपयांवर गेला आहे. पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना अपयशी ठरली असून ९० लाख ग्राहकांनी २०२१-२२ या वर्षात एकही सिलिंडर विकत घेतलेला नाही. आता सी. एन. जी गॅस चे दर देखील वाढत आहे. महागाईवर केंद्राचे नियंत्रण नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. ओबीसींना राजकीय आरक्षण केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळेच मिळत नसल्याची टिका देखील त्यांनी केली.

यावेळी निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे,विक्रम कोठुळे, वसंत अरिंगळे, शंकर मंडलीक, रितेश केदारे, सुधाकर ओहळ, चंदु साडे, संजय पगारे, प्रकाश थामेत, हरिष भंडागे, जगदिश पवार, सुरेखा निमसे,रुपाली पठारे, योगेश निसाळ, सोमनाथ बोराडे, सुनिल महाले, प्रशांत वाघ, गौतम पगारे, मुन्नाभाई अन्सारी, वसीम शेख, शोभा आवारे, नलिनी जठार, किरण राक्षे, अमोल कांबळे, स्वप्निल कासार, विशाल गुंजाळ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...