आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:लोकशाही टिकविण्यासाठी सनदशीर मार्गाचे सरकार हवे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे प्रतिपादन

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या हातातून सत्ता हिसकावून घेतली असून हे सरकार सनदशीर मार्गाने आलेले नाही. लोकशाही टिकवण्यासाठी सनदशीर मार्गाने राजकीय परिवर्तनाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

आंबेबहुला, विल्होळी आणि गौळाणेतील शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरून जलसंपदा विभागाचे नाव काढून टाकल्याने आमदार सरोज अहिरे यांनी माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा रविवारी विल्होळी येथे नागरी सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी शेतकऱ्यांना कोरे सातबारे उतारे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, विक्रम कोठुळे आदी उपस्थित होते.

भुजबळांच्या अनुपस्थितीची चर्चा जयंत पाटील यांचा नागरी सत्कार असतानाही छगन भुजबळांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. सरोज अहिरे यांची कामे सरकार बदलले तरी होतील, कारण सर्व मंत्री हे शिवसेनेतूनच गेले आहेत, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...