आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहाेळीच्या पाचव्या दिवशी शहरात रंगपंचमीचा उत्सव असताे. या रंगपंचमीचे खास आकर्षण असते ते रहाडीमध्ये रंगाेत्सव खेळण्याचे. ३०० वर्षे जुनी पेशवेकालीन पंरपरा आजही या रहाडीच्या माध्यमातून जपली जात आहे. शहरातील ७ रहाडींपैकी ५ रहाडी खुल्या केल्या जाणार आहे. विशेष म्हणजे या सर्व रहाडींमध्ये पूर्णमध्ये नैसर्गिक रंगाचाच वापर केला जाताे. यंदा तिवंधा येथील रहाडीत पिवळा तर जुनी तांबट लेनमध्ये केशरी रंगाचा वापर केला जाणार आहे. पेशवेकालीन रहाड उत्सवामुळे राज्यभरात नाशिकची एक वेगळी आेळख निर्माण झाली आहे.
शहरात एकूण सात रहाडी आहेत. त्यापैकी दाेन बंद असून पाच रहाडी खुल्या केल्या जातात. तिवंधा चाैकातील रहाड १२ फूट खाेल आणि १० फूट रुंद आहे. रहाडीत पळसाच्या पानापासून पिवळा रंग तयार केला जाणार आहे.तर शनी चाैकातील रहाड १२ फूट खाेल आणि १२ फूट रुंद असून या रहाडीत गुलाबी रंगाचा वापर केला जाताे. जुनी तांबट लेन येथे असलेल्या रहाडीत फुलांचा वापर करून केशरी रंग तयार केला जाताे. रंगपंचमीला दिवशी मंत्राेच्चार व पूजा केल्यानंतर या रहाडीत तरुणाईसह आबालवृद्ध मनसाेक्त उड्या मारत रंगाेत्सवाचा आनंद घेतात.
रहाडीच्या पाण्यात उडी मानले जाते आराेग्यदायी पूर्णत: नैसर्गिक रंगाचा वापर रहाड रंगाेत्सवासाठी केला जाताे. पाने, फुले, हळद, कुंकू हे सर्व पदार्थ एकत्र करून चार ते पाच तास एका भांड्यात गरम करून ठेवत रंग तयार केला जाताे. हा रंग असलेल्या रहाडीचा पाण्यात उडी मारल्यास काेणत्याही प्रकारचा त्वचाराेग हाेत नाही असे सांगितले जाते.
पळसाच्या फुलाचा वापर
तिवंधातील रहाड ही ३०० वर्षांपेक्षा जुनी आहे. यंदा रंगासाठी पळसाच्या फुलांचा वापर केला जाणार आहे. - मयूर भालेराव, अध्यक्ष, हिंदमाता सेव मंडळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.