आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नाट्यगृह तुमच्या दारी':नाशिकच्या रंगकर्मींची प्रायोगिक नाटकासाठी अनोखी चळवळ, कलेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजमितीस प्रायोगिक नाटकांचा प्रेक्षकवर्गच नाहीसा झालाय. प्रायोगिक नाटकांना प्रेक्षकांच्या प्रतिसादाची नितांत गरज आहे. प्रायोगिक नाटक देखील दर्जेदार असतात, पण त्यातील कलाकार हे तितकेसे प्रथितयश नसल्यामुळे अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. हेच हेरून नाशिकचे रंगकर्मी आता नाट्यगृहच आपल्या घरी घेऊन येत आहे. यासाठी 'नाट्यगृह तुमच्या दारी' या उपक्रमातून नाटकांचे प्रयोग सुरू आहेत.

अभिनेता कल्पेश कुलकर्णी याबाबत म्हणाले, अद्यापही अनेकांना नाटक म्हणजे काय, ते कसं असतं हे सुद्धा अनेकांना माहिती नाही. ही वस्तुस्थिती आहे. तसेच सर्वच रसिक प्रेक्षकांना नाट्यगृहात जाऊन प्रयोग पाहता येत नाही. बऱ्याच मर्यादा असतात. नाटक पाहण्यापासून कुणी वंचित राहू नये, ही कला ओटीटीच्या जमान्यात जिवंत राहावी, प्रेक्षक नाटकाकडे वळावेत, नवे नाट्यरसिक घडावेत हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून हा उपक्रम राबविला जात आहे.

ही चळवळ अविरत सुरू ठेवण्याचा या रंगकर्मींचा मानस आहे. पण ही चळवळ जिवंत ठेवणं हे सर्वस्वी नाट्यरसिकांच्या हातात असल्याचे या चळवळीतील कलाकार व्यक्त करतात.

सोसायटीत लाईट्स आणि म्युझिक

शहरातील विविध सोसायटींमध्ये नाटक नेऊन प्रत्यक्ष नाट्यगृहात आसनस्थ होऊन प्रयोग पाहिल्याची अनुभूती देण्याची ही चळवळ आहे. खऱ्या अर्थाने एक नाट्य तळमळ ठरत आहे. आता हे नाट्यगृहच आपल्या दारी आल्यावर सुजाण प्रेक्षकांची ही जबाबदारी आहे नाट्यगृहात जाऊन नाटक बघण्याची आणि रंगभूमीला जिवंत ठेवण्याची.

नाटकांची मोफत प्रसिद्धी

या चळवळीत मखमली पडदे, लाईट्स, म्युजिक आणि सगळी तंत्रं वापरून नाटक सादर होत आहे. रंगभूमीची नि:स्वार्थ सेवा करणाऱ्या कलाकारांचा तसेच सामाजिक क्षेत्रात नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान. तसेच याद्वारे प्रायोगिक नाटकातील कलाकार त्यांच्या नाटकांची मोफत प्रसिद्धीही (Promotion) होत आहे. आपल्या सोसायटीत प्रयोगाचे आयोजन करण्यासाठी 9552435076 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन या कलाकारांनी केले आहे.

'चलो सफर करे'

'नाट्यगृह तुमच्या दारी' अंतर्गत या वर्षी शंतनू चंद्रात्रे लिखित चलो सफर करे हे नाटक सादर होत आहे. याचे दिग्दर्शन पांडुरंगकर्मी, नेपथ्य ऋषिकेश पाटील, प्रकाश योजना चैतन्य गायधनी, संगीत नितीन पावरा, ललित श्रीवास्तव, वादक वैष्णवी शेजवलकर (संवादिनी), आयुष शिरसाठ (पखवाज), रंगभूषा : स्वरांजली गुंजाळ, रंगमंच सहाय्य नेहा उपाध्याय यांचे आहे. तर नाटकात ऋतुजा पाठक, कल्पेश कुलकर्णी, अनिकेत इनामदार, हनुमान जाधव, प्रद्युम्न शेपाळ, अमेय आचार्य यांच्या भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...