आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये पहिल्यांदाच हॉटेल आणि रेस्टॉरंटस् असोसिएशनचे अधिवेशन:दिलीप वेंगसकरांच्या हस्ते उद्या उद्घाटन ; 9 ऑक्टोबरपर्यंत चालणार अधिवेशन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेचे पश्चिम विभागिय अधिवेशन पहिल्यांदाच नाशिकमध्ये होत आहे. अधिवेशनचे उद्घाटन शुक्रवारी (7ऑक्टोबर) प्रसिद्ध क्रिकेटपटू दिलीप वेंगसकरांच्या हस्ते होणार आहे.

यंदा संस्थेचे 19 वे अधिवेशन

सदरील हे अधिवेशन रविवार (9 ऑक्टोबर) पर्यंत चालणार आहे. हे संस्थेचे 19 वे विभागीय अधिवेशन असून या निमित्ताने हॉस्पिटॅलिटी उद्योगातील अनेक नामवंत व्यावसायिक नाशिकमध्ये येत असल्याची माहिती असोसिअशनचे अध्यक्ष प्रदीप शेट्टी यांनी दिली.

3 वर्षाच्या खंडानंतर होणार अधिवेशन

रॅडीसन ब्ल्यु येथे होत असलेल्या या अधिवेशनाचे उद्घाटन उद्या सायंकाळी 6.00 वाजता होत आहे. विशेष म्हणजे, सुमारे 3 वर्षाच्या खंडानंतर हे अधिवेशन होत असून त्यात अनेक हॉटेल व रेस्टॉरंटचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी , गुंतवणूकदार आणि उद्योगातील दिग्गज सहभागी होणार आहेत. व ते विविध विषयावर विचारमंथन आणि संवाद साधतील.

काय म्हणाले प्रदीप शेट्टी?

हॉस्पिटॅलिटी उद्योगापुढील आव्हाने आणि असणाऱ्या संधीची माहिती, नवे तंत्रज्ञान व नव्या उत्पादनाची माहिती तसेच नेट्वर्किंगची संधी या अधिवेशनामुळे मिळणार असून पर्यटन क्षेत्रात महत्वाचे शहर असणाऱ्या नाशिकची निवड या अधिवेशनासाठी करण्यात आली आहे. या अधिवेशनामुळे नाशिक मधील वाईन पर्यटनासोबतच धार्मिक, कृषी , सांस्कृतिक, साहसी पर्यटन तसेच त्याच्याशी संबंधित अनेक सेवांना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असेही प्रदीप शेट्टी म्हणाले.

नाशिकमध्ये स्टार हॉटेल्सची संख्या वाढत असून गेल्या तीनच वर्षात मेरीयट, रेडीसन ब्ल्यु, सयाजी यांसारख्या हॉटेल्सचे आगमन झालेले असून नुकतेच वुके मधील हॉटेल स्वीस ट्राफलगारची एंट्री झाली आणि 100 कोटींच्या गुंतवणूकीची घोषणाही त्यांनी केली आहे. याशिवाय टाटा च्या विवांता हॉटेलासाठी शहरातील दिपक बिल्डर अ‍ॅण्ड डेव्हलपर्स यांच्यासोबत करार झालेला आहे. सध्याचे गेट वे हे हॉटेल देखिल टाटा समुहाच्या अगदी वरच्या श्रेणीतील ताज मध्ये रूपांतरीत होण्याची चर्चा आहे, या पार्श्वभुमीवर हे अधिवेशन नाशिकमध्ये या क्षेत्रात नवी गुंतवणूक घेऊन येण्याची शक्यता अधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...