आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने आणि नाशिक जिल्हा सेपकटेकरा असोसिएशनच्या सहकार्याने मीनाताई ठाकरे स्टेडियमध्ये अंतरशालेय सेपेकटेकरा स्पर्धेत नवजीवन डे स्कूलच्या १४ व १७ वर्षाच्या आतील मुलं आणि मुलींच्या संघाने बाजी मारीत प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची निवड विभागीय स्तरावर झाली आहे. यात १४ वर्षीय मुलांच्या गटात कॅप्टन अनिश काजला, राज आहेर, हर्षवर्धन मोरे, श्लोक जेजुरकर,आदर्श सहानी १४ वर्षीय मुलींच्या गटात कॅप्टन रिया घरटे, सोनकल चौधरी, तनिष्का बाविस्कर, तेजल पवार, अनुष्का खैरनार, १७ वर्षीय मुलांच्या गटात कॅप्टन आर्थक वारुंगसे, अभिनाश सहानी, सोनू वर्मा, प्रतीक महाले,यश काकूळते, १७ वर्षीय मुलींच्या संघात कॅप्टन विद्या महाले, ऋतुजा मोरे, तनिष्का आहेरराव, आर्या पाटील, अध्यई सोनवणे यांचा सहभाग होता. त्यांना क्रीडा शिक्षक भूषण सोन्नीस यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल शाळेचे संस्थापक सुभाष देशमुख, विजया देशमुख, सहसंचालक मंगला पवार, मुख्यध्यापिका डिंपल पाटील, संपत अहिरे, अविनाश नायर, रोहिणी नवले व शाळेचे शिक्षक आदींनी अभिनंदन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.