आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरचना:नवरचना बालवाडीचे स्नेहसंमेलन रंगले‎

गंगापूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालवाडी (गंगापूरराेड)‎ विभागाच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक‎ स्नेहसंमेलन विविध उपक्रमांद्वारे‎ उत्साहात साजरे करण्यात आले.‎ प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र‎ सेवा संघाचे जेष्ठ कार्यकारिणी‎ सदस्य अॅड. मिलिंद चिंधडे‎ उपस्थित होते. अध्यक्षस्थानी‎ विदयमान अध्यक्ष सुधाकर साळी‎ यांनी भूषविले. बालकलाकारांनी‎ सुंदर स्वागतगीतातून पाहुण्यांचे‎ स्वागत केले.‎ मोबाइल विषयावरील बालगीत‎ ऐकवून मुलांशी संवाद साधला.‎ अध्यक्षांनी पालकांना मार्गदर्शन‎ करत त्यांच्याशी संवाद साधला.‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न‎ झाला. "माझा लाडका देवबाप्पा’‎ गीताने सुरुवात झाली. गाण्यापूर्वी‎ बालवाडीच्या मुलांनी अतिशय‎ सुंदर सूत्रसंचालन कार्यक्रमाचे‎ विशेष आकर्षण ठरले. विविध‎ बालगीते, दांडिया, देशभक्तीपर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ गीत, गोष्ट-चिमणीला सापडला‎ मोती आदी कार्यक्रम सादर झाले.‎ मुख्याध्यापिका अलका गाजरे‎ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम‎ उत्तम झाला. संस्था पदाधिकाऱ्यांनी‎ विभागाचे विशेष कौतुक केले.‎ कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...