आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे तारांकित हाॅटेलात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मंथन:उद्यापासून शिर्डीत 3 दिवस अधिवेशन, शरद पवारांची उपस्थिती

शिर्डी / नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चार महिन्यांपूर्वी राज्यात सत्तापालट झाल्यानंतर राष्ट्रवादीने भविष्यावर मंथन करण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिर्डी येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ३ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत अधिवेशन होत आहे.

किमान ४० महत्त्वाचे नेते, १८०० पदाधिकारी त्यात सहभागी होतील. ओला दुष्काळ, शेतकरी कर्जबाजारीपणा, परराज्यामध्ये पळवले जाणारे उद्योग आदी गंभीर विषयांवर चर्चा करण्यासाठी येणाऱ्या नेत्यांची तारांकित हाॅटेल तर पदाधिकाऱ्यांची ४०० साध्या खोल्यांमध्ये निवास व्यवस्था केली आहे. याशिवाय येणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना भक्त निवासात मुक्काम करावा लागणार आहे.

सत्तेतून पायउतार झाल्यानंतर राष्ट्रवादीने ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभा जेमतेम सव्वा वर्षावर असल्याने पक्षबांधणी व आंदोलने ठरवण्यासाठी शिर्डीतील सन अँड सँड हाॅटेलात हे अधिवेशन होत आहे. त्यात जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, विधानसभा निरीक्षक, माजी मंत्री, विद्यमान व माजी खासदार, आमदार सहभागी होतील. ३ नोव्हेंबरला प्रमुख नेत्यांची पवारांसोबत महत्त्वाची बैठक होईल, असे म्हटले जात आहे. दरम्यान, प्रदेश अधिवेशन असल्याचे कारण देत शिर्डीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना कोणतीही माहिती दिली जात नसल्याचे समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...