आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपला टोला लगावला आहे. या पराभवातून भाजपने धडा घ्यावा. देशात आता ईडी आणि सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण चालणार नाही, भाजपने आता जमिनीवर येऊन काम करावे असे भुजबळ म्हणाले. शनिवारी लासलगाव येथे माध्यमांशी ते बोलत होते.
महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. या विधानपरिषद निवडणुकीत भाजपला 6 पैकी केवळ 1 जागा जिंकता आली. भुजबळ म्हणाले की, या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे चमत्कार झाला. तिन्ही पक्षांची युती झाल्यामुळे मते विभागली नाहीत. पुणे आणि नागपूर या भाजपच्या बालेकिल्ल्यातही मतदारांनी महाविकासआघाडीच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे जनतेने महाविकासआघाडीला स्वीकारल्याचे दिसून आले. या सगळ्यातून भाजपने धडा घ्यायला हवा. त्यांनी जमिनीवर उतरून काम करायला हवे, असा सल्लाही छगन भुजबळ यांनी भाजपला दिला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.