आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य:नाशिकमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून निषेध, माफी न मागितल्यास आंदोलनाचा इशारा

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसने राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

कोश्यारी यांनी केवळ मुंबईचाच नव्हे तर महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अपमान केल्याची टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी केली.

आंदोलनाचा इशारा

भामरे म्हणाल्या, कोश्यारीसाहेब आपण महाराष्ट्राचे प्रथम नागरिक आहात. या स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आहे. मुंबईसाठी १०५ हुतात्म्यांनी आपले प्राणाचे बलिदान दिले आहे. आपण गुजराती आणि राजस्थानी माणसाचे कौतुक करताना समस्त महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अपमान केला. त्यामुळे थोडा जरी आपल्या रक्तात स्वाभिमान शिल्लक असेल तर महाराष्ट्रातील मराठी माणसाची माफी मागा. अन्यथा चालते व्हा. तसेच, राज्यपालांनी माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस ठिकठिकाणी आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

मुंबईत जपी रोड, अंधेरी येथे झालेल्या श्रीमती शांतीदेवी कोठारी चौक नामकरण सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केले होते.

बातम्या आणखी आहेत...