आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 ला नो़टबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच या नोटबंदीला आज सहा वर्ष पूर्ण झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नोटबंदीला श्रद्धांजली देऊन निषेध नोंदवला.
यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कोंडाजीमामा आव्हाड, नानासाहेब महाले, अर्जुन टिळे, बालम पटेल, विष्णूपंत म्हैसधुणे, निवृत्ती अरिंगळे, अनिता भामरे, संजय खैरनार, धनंजय निकाळे, राजाराम धनवटे, मनोहर कोरडे, मकरंद सोमवंशी, शादाब सय्यद, बाळा निगळ, जय कोतवाल, निखिल भागवत, मुकेश शेवाळे, निलेश भंदुरे, अमोल नाईक, डॉ. संदीप चव्हाण, संतोष भुजबळ, हर्षल चव्हाण, अक्षय पाटील, प्रविण बोराडे, विक्रम कोठुळे, साजिद मुलतानी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नोटबंदी म्हणजे मोठी घोडचूक
2016 मध्ये पंतप्रधानांनी नोटबंदी करण्याचा निर्णय घेतला. पंरतु या नोटबंदीच्या निर्णयाचा विसर सर्वत्र पडलेला दिसतो. भाजप सुद्धा या निर्णयावर मौन बाळगून असून जनतेने हा निर्णय विसरावा असे प्रयत्न सतत होत असतात. नोटबंदी स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील एक मोठी घोडचूक होती. या निर्णयाने भारताची अर्थव्यवस्था अपंग झाली असून अर्थव्यवस्थेचा कणा या निर्णयामुळे मोडला.
नोटबंदी निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था अपंग
काळ्या पैशावर कारवाई, बनावट नोटा चलनातून हद्दपार करणे, दहशतवादी व नक्षलवाद्यांच्या कारवाया रोखणे व कॅशलेस व्यवहार करणे हे यामागे उद्देश होते. परंतु यातील कॅशलेस व्यवहार या मुद्दा सोडला तर वरील एकही मुद्दा यशस्वी झाल्याचे निदर्शनास आले नाही. यापुढील काळातही कॅशलेस व्यवहारावर कर लावण्याच्या तयारीत असल्याचे केंद्र सरकार दिसत आहे.
नोटबंदी नंतर 99 % नोटा परत
नोटबंदीने जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणि नवीन नोटा घेण्यासाठी संपूर्ण देशाला रांगेत उभे करून अनेकांचा बळी घेतला. नोटबंदी नंतर जवळपास 99 टक्के नोटा परत आल्या. यामुळे काळापैसा गेला कुठे असा सवाल जनतेत आहे. नोटाबंदीचा सर्वात मोठा परिणाम लघु उद्योगांवर झाला, नोटबंदीपुर्वी बहुतांशी उद्योगांमध्ये रोखीने व्यवहार होत होते.
नोटबंदीचा लघू उद्योगांवर मोठा परिणाम
नोटाबंदीच्या काळात या उद्योगांमध्ये रोखीने व्यवहार होणे बंद झाले, रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांचे उद्योग ठ्प्प झाले. दहशतवादी व नक्षलवाद्यांच्या कारवाया अजूनही सुरुच असून त्यांच्या माध्यमातून बनावट चलनी नोटा बाजारपेठात आल्या आहेत. एकंदरीत सर्व प्रकरण बघता रांगेत बलिदान दिलेले नागरिक, अर्थव्यवस्था खिलखिली झाल्याने कर्जात बुडालेली जनता व लघु उद्योग बंद पडल्याने आत्महत्या करणारे मजूर यांना श्रद्धांजली वाहण्यात आल्याचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.