आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान:राष्ट्रवादीचे संवाद अभियान; नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू: ठाकरे

नाशिकरोड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जेलरोड परिसरात संवाद अभियान राबविण्यात आले. अभियानाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ठाकरे हे काही नागरिकांच्या घरी गेले असता त्यांना नागरिकांनी प्रभागातील समस्या सांगितल्या. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू तसेच वेळप्रसंगी गरज पडली तर आंदोलन उभे करू, असे ठाकरे सांगितले.

यावेळी व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, नाशिकरोड विभाग अध्यक्ष मनोहर कोरडे, योगेश निसाळ, राहुल तुपे, मंगेश लांडगे, संजय खैरनार, सुषमा पगारे, चंदू साडे, संजय बोडके, बाळासाहेब जाधव, गौतम पगारे, हेमंत कांबळे, राजाभाऊ पवार, सुरेखा निमसे, विद्या पाटील, कुंदा शहाणे, रूपाली पठारे, संजय पगारे, नियामत शेख, नीलेश जगताप, वजाहत शेख, प्रवीण बोराडे, राकेश कांबळे, हर्षदा बर्वे, वनिता कोरडे, बाबासाहेब अस्वले, किरण राक्षे, प्रज्योत सुरवाडकर, प्रथमेश पवार, मोहन निसाळ, अनिल घोलप, अतुल चव्हाण, ओम काळे, आशुतोष चव्हाण, आकाश म्हस्के, आकाश गवारी, प्रसाद वागळे, मानस जगताप, भूषण बागूल, तेजस सुरवाडकर, मयूर दोबाडे, रोहित जाधव, तुषार ताजनपुरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...