आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अाता नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) ही प्रवेश परीक्षा रविवारी (दि.७) घेतली जाणार अाहे.
शहरातील २० परीक्षा केंद्रांवर ११ हजार विद्यार्थी प्रविष्ठ होणार अाहे. नीट परीक्षा मराठी, हिंदी व इंग्रजीसह १३ भाषांमध्ये होईल. नीट परीक्षा अाॅफलाइन पद्धतीने होणार असून देशभरातील विविध शहरांतील केंद्रांवर एकाच वेळी ही परीक्षा होणार अाहेत.
...नंतर प्रवेश दिला जाईल
या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी प्रविष्ठ होणार असल्याने परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जाणार अाहेत. परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी मेटल डिटेक्टरद्वारे विद्यार्थ्यांची तपासणी झाल्यानंतर प्रवेश दिला जाईल. तसेच विद्यार्थ्यांना कोणतेही इलेक्ट्राॅनिक साहित्य घेऊन जाण्यास बंदी असेल. सकाळी ११.३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, अशाही सूचना देण्यात अाल्या अाहेत.
नियमांची माहिती घ्या
कडक तपासणी, नियमांचे पालन परीक्षेचे कडक वातावरण विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या पचनी पडत नाही, असा अनुभव आहे. परीक्षेपूर्वी अर्धा तास आधी परीक्षा कक्षात प्रवेश करण्याचा नियम वादाचा ठरतो. सर्व विद्यार्थी एकाच वेळी तपासणी करून सोडणे शक्य होत नसल्याने ऐन परीक्षेच्या वेळी गर्दी होते. त्यामुळे परीक्षा कक्षात आत जाताना लांब बाहीचा शर्ट, बुट, कोणतेही दागिने, कानातील, हातातील दागिने, मोबाइल, बॅग, ट्रान्सपरंट नसलेल्या वस्तूंना बंदी आहे. यामुळे तपासणी वेळी वाद होतात. ही परीक्षा वर्षातून एकाच वेळी होत असल्याने विद्यार्थ्यांनी सर्व नियमांची माहिती घ्यावी, असे आवाहन केले आहे.
नीट परीक्षेकडे लक्ष
वैद्यकीय अभ्यासक्रमातील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्तरित्या नीट परीक्षा घेतली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे अखिल भारतीय स्तरावरील महत्वाच्या परीक्षांचे आयोजन केले जाते.
इंजिनिअरिंग प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षेचा पहिला व दुसरा टप्पा घेण्यात आल्यानंतर या परीक्षेचा निकालही नुकताच जाहीर झाला. जेईई मेन झाल्यानंतर लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष नीट परीक्षेकडे लागले अाहे. नीट परीक्षेचे वेळापत्रकासह अभ्यासक्रम, पात्रता, परीक्षा केंद्र या विषयीची सर्व माहिती https://neet.nta.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षेसाठी हाॅल तिकीट एनटीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजीसह १३ भाषांमध्ये
१८० प्रश्नांसाठी एकूण ७२० गुण वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमातील प्रथम वर्ष प्रवेशासाठी नीट परीक्षा अनिवार्य आहे. नीट परीक्षा लेखी स्वरूपात घेतली जाते. दुपारी २ ते ५.२० या वेळेत नीट परीक्षा होईल. या परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री, बाॅटनी आणि झूलाॅजी या चार विषयांवर एकूण १८० प्रश्न विचारले जातील.
एकूण ७२० गुणांसाठी ही परीक्षा होईल. एमसीक्यू पद्धतीने विभाग ए आणि बी अशा दोन सत्रात प्रश्नांची विभागणी असेल. प्रत्येक प्रश्नाला चार गुण असतील. तर चुकीच्या उत्तराला १ गुण कमी होईल. तीन तास २० मिनिटांचा वेळ असेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.