आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:नीट चा निकाल जाहीर;  नाशिकचे विद्यार्थी चमकले

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (एनटीए)तर्फे एमबीबीएस व बीडीएस या वैद्यकीय विद्याशाखांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नॅशनल इलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.७) रात्री उशिरा जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत नेत्रदीपक यश पटकावले. नाशिकमधील रेझोनन्स क्लासेसच्या प्रिया पाटील या विद्यार्थिनीला ९९.०४ पर्सेंटाईल, सुमित शेळके ९९.२१ पर्सेंटाईल, श्रेया ठाकूर हिने ९७.६८ पर्सेंटाईल मिळवत उत्तीर्ण झाले आहेत.

या विद्यार्थ्यांना रेझोनन्सचे प्रमुख संचालक मनीष शंकर, डाॅ. नितीन पाठक, स्वप्नील जैन यांचे मार्गदर्शन लाभले. नीट परीक्षेत देशभरातून १७ लाख ६४ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पहिल्या ५० क्रमांकामध्ये १८ मुलींनी स्थान पटकावत उत्तुंग यश मिळवले. ntaneet.nic.in किंवा nta.ac.in. या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

या विद्यार्थ्यांना पटकावले यश
नीट परीक्षेत जोशी लर्निंग सेंटरचे गिरीष इप्पर (६३८), प्रतीक सोनवणे (६३५), सोनल निले (५७८), प्रमोद वारुळे (५५०), प्रवीण भगत (५४६), विनित गांधी (५१९), कुणाल कुडाळे (५१८), प्रणिधी देशमुख (५००) या विद्यार्थ्यांनी यश पटकावले. तसेच स्नेहा जैन, विनीत भंडारी, आशय सोनवणे या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत यश मिळवले.

बातम्या आणखी आहेत...