आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेट परीक्षेनंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहे. नेट परीक्षा जून आणि डिसेंबर महिन्यात घेतली जाते. डिसेंबर 2022 मध्ये होणारी परीक्षा आता नवीन वर्षात 21 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत या कालावधित होणार आहे. या परीक्षेसाठी युजीसीच्या संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 17 जानेवारीपर्यंत इच्छूक विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.
वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक, ज्युनियर रिसर्च फेलोशीप, असिस्टंट प्रोफेसर या पदांसाठी राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन पद्धतीने पात्रता चाचणी परीक्षा घेतली जाते. सर्वसामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 1100 रुपये शुल्क भरावे लागेल. तर ओबीसी उमेदवारांना 550 तर मागासवर्गीय व दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 275 रुपये शुल्क असेल.
अशी होईल परीक्षा
नेट परीक्षा वर्षातून दोन वेळा हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये घेतली जाते. 180 मिनिटांच्या परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका असतात. पहिल्या प्रश्नपत्रिकेत 50 तर दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत 100 बहुपर्यायी प्रश्न असतात. या परीक्षेत निगेटिव्ह मार्कींग केले जात नाही. दरम्यान 2023 या वर्षातील पहिली परीक्षा 13 ते 22 जून तर दुसरी परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. युजीसीच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे
सेट परीक्षेचेही वेळापत्रक जाहीर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राज्यस्तरीय पात्रता चाचणी अर्थात सेट परीक्षेचे वेळापत्रक ही जाहीर करण्यात आले आहेत. नाशिक सह राज्यभरातील विविध केंद्रांवर सेट परीक्षा घेतली जाणारा असून अधिक माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.