आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा धाेरण:सायबरसह युद्धाच्या विविध नव्या पद्धतींमुळे भारतासमोर नवी संकटे; लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे यांचे प्रतिपादन

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीमांवरील सुरक्षितेतसाठी आपले सैनिक सज्ज आहेत, ते आव्हानांचा यशस्वीपणे सामना करत आहेत. मात्र सायबरसह सायकॉलॉकल, स्पेस, केमिकल, बायोलॉजिकल (वॉरफेअर)द्वारे होणाऱ्या हल्ल्यांना परतवून लावणे हे भारतासमोरील मोठे आव्हान आहे, या नव्या पद्धतीमुळे आपल्यासमोर संकट उभे राहिले असल्याचा संवाद लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे साधला.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे घेण्यात येत असलेल्या धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे (पीव्हीएसएम,एव्हीएसएम,एसएम) यांनी गुंफले. ‘कॉम्प्रेहेन्सिव्ह नॅशनल सिक्युरिटी अॅण्ड आत्मनिर्भयता’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. संस्थेच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरवणे, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, मेजर जनरल (निवृत्त) सायरस पिठावाला हे व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी खंदारे म्हणाले, जय हिंद याचा अर्थ देशाभिमान असणे किंवा नेहमी विजयाच्या मार्गावर वाटचाल करणे, राष्ट्रीय सत्ता सहभाग (नॅशनल पॉवर), राष्ट्रीय सुरक्षितता (नॅशनल सिक्युरिटी) आणि राष्ट्रीय कार्यात सहभाग (नॅशनल इंटरेस्ट) हे तिन्ही शब्द प्रत्येक देशासाठी महत्त्वाचे शब्द आहे. नॅशनल इंटरेस्ट हा देश, राष्ट्राशी संलग्न आहे. आपली ज्यावेळेस अंतर्गत आणि बाह्य ताकद वाढते, आपण सक्षम होतो तेव्हा नॅशनल पॉवर होते. प्रत्येकाचे कर्तव्य आहे की आपल्या देशाची नॅशनल पॉवर वाढविण्याबरोबरच नॅशनल सिक्युरिटी जपणे हे अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रीय सुरक्षितततेकडे दुर्लक्ष केले त्याचा परिणाम हा चीनविरुद्ध १९६२ ला भोगावा लागला, त्याचे पडसाद आपल्याला नंतरच्या काळातही दिसून आले.

१९६५ च्या काळात पाकिस्तानला वाटले की आपण भारताच्या काही भागावर कब्जा करू शकतो, या काळात आपण योग्य पद्धतीने तडजोड (बार्गेनिंग) करू शकलो नाही. यावेळी त्यांनी लालबहादूर शास्त्री यांचे उदाहरण दिले. अन्नधान्याचा मुद्दा सैनिकी सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढे आला तेव्हा आपण आठवड्यातून एक दिवस उपवास करू शकतो का, हे ठरले. तांत्रिकदृष्ट्या आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने कमकुवत ठरत होतो. १९६७-१९७१ या कालावधीत झालेल्या युद्धातील विजयाने भारताची मान उंचावली. १९८९, १९९१ शीतयुद्धाचाही मुद्दा पुढे आलेला दिसतो, अंतर्गत सुरक्षिततेइतकीच बाह्य सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

ईशान्येकडील भागातील चकमकी याकडेही आपल्याला कानाडोळा करता येणार नाही, सुरक्षिततेच्या मुद्यांवर आपण चर्चा करतो तेव्हा स्थानिक, राज्य, केंद्र आणि सैनिकी खात्याचे सुरक्षा अधिकारी यांच्या बाबींचा विचार करायला हवा. माओवाद्यांकडून वैयक्तिकस्तरावर होणारे हल्ले चकमकी हे सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे. आरोग्याचा विचार केला तरी या मुद्यांकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. अगदी पशुपतीनाथ ते तिरुपतीपर्यंतच्या भागाचा विचार करावा लागेल.

वाढता भ्रष्टाचार, विभक्तीकरण, असुरक्षिततेचे वातावरण याकडे प्राधान्याने पहावे लागेल, हे सांगताना त्यांनी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण दिले. कॅप्टन नरवणे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सौ. स्नेहा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. शिशुविहार बालक मंदिराची विद्यार्थिनी ममता कुलकर्णी हिने पद्य म्हटले. गायत्री जोशी हिने आभार मानले. पूर्वांचलच्या मुलींनी वंदे मातरम् म्हटले.

बातम्या आणखी आहेत...