आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युत ऑडिटचा स्विचऑन:अग्निशमन ची नवी आचारसंहिता फायरबराेबर विद्युत ऑडिटही सर्वांना सक्तीचे

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरांमध्ये झपाट्याने व्यावसायिक आस्थापना तसेच दुकानांमध्ये भर पडत असून या ठिकाणी जुन्या व जीर्ण झालेल्या वीजतारांमुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची भीती लक्षात घेत मॉल, छोटी दुकाने, रहिवासी इमारती, मंगल कार्यालय, सरकारी इमारती, सभागृहे यांना विद्युत ऑडिट करून घेण्याचे आदेश महापालिकेच्या अग्निशामन विभागाने दिले आहेत. हे ऑडिट करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार समिती नियुक्तीसाठी महावितरणकडे पाठपुरावा केला जात आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी महापालिकेने महावितरणकडे यासंदर्भात प्रस्ताव पाठवल्यानंतर त्यांच्याकडून दाद मिळाली नव्हती.

गंजमाळ येथील मास्टर मॉलला गेल्या महिन्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी झाली. पालिकेच्या तपासात या मॉलमध्ये बांधकामात अनधिकृतपणे केलेले बदल आणि वापरातही बदल आढळून आले होते. तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी या मॉलच्या बांधकामाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार केलेल्या चौकशीतून मॉलचे बांधकामच अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. हॉलच्या जागेचा वापर गोडाऊनसाठी करण्यात आल्याचे आढळून आले होते. यापूर्वी महात्मा गांधीरोडवर बेसमेंटमध्ये असलेल्या प्रसिद्ध संगणक विक्री करणाऱ्या मॉलला शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. महापालिका क्षेत्रामध्ये जवळपास एक लाखाहून अधिक जुन्या व्यावसायिक मिळकती असून या ठिकाणी २० ते ३० वर्षांपूर्वी जुनी विद्युत व्यवस्था असल्यामुळे तसेच अनेक ठिकाणी जुन्या वीज वाहकतारा असल्यामुळे शॉर्टसर्किटची भीती आहे. ही बाब लक्षात घेत महापालिकेने आता ज्या पद्धतीने फायर ऑडिट केले जाते त्याच धर्तीवर इलेक्ट्रिक ऑडिट करून घेण्याचे आदेश दिले आहेत. विद्युत ऑडिट करून घेण्यासाठी महावितरण कंपनीची मदत घेतली जाणार असून त्यांना तज्ज्ञ सल्लागार व संस्था उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेच्या अग्निशामक विभागाने पत्र दिले आहे.

पालिकेचा सल्लागार समितीसाठी महावितरणकडे पाठपुरावा
महापालिकेच्या पत्राला ठेंगा
तीन वर्षांपूर्वी महापालिकेने महावितरणला पत्र देत शहरातील इमारतींच्या विद्युत ऑडिटची गरज व्यक्त केली हाेती. पालिकेचा अग्निशमन विभाग हायर ऑडिट करून घेतो तसे आपण आपल्या स्तरावर विद्युत ऑडिट करावे व माहिती पालिकेला कळवावी, असे पत्र मुख्य अग्निशामक अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र महावितरणने त्यास ठेंगा दाखवला. आता मुख्य अग्निशामक अधिकारी संजय बैरागी यांनी पुन्हा पत्र पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...