आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराच्या सुरक्षेला प्राधान्यासह रस्त्यावरीले गुन्हे रोखण्यासाठी आणि गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी पोलिसिंग राबवले जाईल. अगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचे नियाेजन हाेणार असल्याचा संवाद नवीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ‘दिव्य मराठी’शी साधला.
पोलिस आयुक्तालयात आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याकडून शुक्रवारी (१६) सायंकाळी शिंदे यांनी पदभार स्वीकारला यावेळी ते म्हणाले की, नाशिक माझ्यासाठी नवीन नाही. स्ट्रीट क्राइम वाढल्यानंतर नागरिकांना असुरक्षित वाटते. सामान्य नागरिकांना पोलिसांकडून सुरक्षेच्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्यासाठी विशेष नियाेजन करणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत. वाहतुकीच्या समस्येकडे लक्ष दिले जाणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी उपआयुक्त पौर्णिमा चौघुले, प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त दीपाली खन्ना आदी उपस्थित होते.
कायदा पाळणारे शहर कुंभमेळ्यामुळे शहराचे नाव जागतिक पातळीवर आहे. शहर वाढले की वाहतूकीच्या समस्या निर्माण होतात. गुन्हेगारी वाढते गुन्हे नियंत्रणात येण्यासाठी प्रभावी नियोजन केले. नाशिक कायद्याचे पालन करणारे सुंदर शहर आहे. नाशिक शहरात काम केल्याचा अनुभव कायमच स्मरणात राहणार आहे. -जयंत नाईकनवरे, मावळते पाेलिस आयुक्त
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.