आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातपूर हिंदू नववर्ष स्वागत यात्रासमितीच्यावतीनेगुढीपाडव्याच्या दिवशीबुधवारी (दि. २२)परिसरातून सात स्वागतयात्रा निघणारआहेत.मध्यवर्ती स्वागतयात्रा समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब पोरजे यांची निवड करण्यात आली आहे. स्वागत समितीची नुकतीच बैठक घेण्यात येऊन नियोजन करण्यात आले. समितीचे संयोजक लोकेश कटारिया आहेत. सातपूर कॉलनीतील अमृतगणेश यात्रा समिती प्रमुख म्हणून चित्रा बोडके, दक्षिणेश्वर हनुमान मंदिर यात्रा समिती प्रमुख लीलावती भवर, समतानगर यात्रा समिती प्रमुख गौरव बोडके, महालक्ष्मी स्वागतयात्रा प्रमुख सरला जाधव, अशोकनगर स्वागतयात्रा प्रमुख रवी पालवे, राज्य कर्मचारी स्वागतयात्रा प्रमुख अरुण घुगे, जाधव संकुल स्वागतयात्रा प्रमुख मनोज तांबे यांची निवड झाली. सकाळी सात वाजता सातही ठिकाणावरून निघणाऱ्या स्वागत यात्रा अशोकनगर येथील जाणता राजा मैदानावर एकत्र जमतील व तेथे भव्य सामूहिक गुढी उभारली जाईल. पारंपरिक वेशभूषा, भगवा फेटा, लेझीम पथक, घोडे असे मुख्य आकर्षण राहणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.