आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवविवाहित दाम्पत्याची गळफास लावून आत्महत्या:सावकारांच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, चिठ्ठीतून व्यक्त केल्या यातना

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावकाराच्या जाचाला कंटाळून नवविवाहीत जोडप्याने गळफास लावून घेतल्याचा धक्कादायक प्रकार महामार्गावरील एका सोसायटी मध्ये उघडकीस आला. कर्जबाजारीपण आणि आर्थिक विवंचनेतून दोन सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी मृत्यूपुर्वी लिहलेल्या चिठ्ठीत नमुद केले आहे. इंदिरा नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फ्लॅटमध्ये गळफास घेतला

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाथर्डी फाटा परिसरातील नयनतारा गोल्ड येथे राहणारे गौरव जितेंद्र जगताप (वय 29), नेहा गौरव जगताप (वय 23) या दोघा नवदाम्पत्याचे मृतदेह फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले होते. दोघांकडे आढळून आलेल्या चिठ्ठीत साडे सहा लाखांची आर्थिक फसवणूक झाल्यानंतर संशयित युनूस मनियार आणि मयुर बैरागी या दोघांकडून काॅल्स येत होते. या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमुद केले आहे.

पोलिसांकडूनही दुजोरा

साडेसहा लाखांची आर्थिक फसवणूक झाल्यानंतर सातत्याने येणार्‍या फोन कॉल्सला कंटाळून एका दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगीतले. याप्रकरणी यश जगताप रा. राणाप्रताप चौक सिडको यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

अशी घडली होती घटना

यश जगताप यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भाऊ गौरव जितेंद्र जगताप आणि त्यांची पत्नी नेहा जगताप यांना मावशी चित्रा यांनी काॅल केला. दोघांनी काॅल घेतला नाही म्हणून नेहा काॅल का उचलता नाही. ते बघण्यासाठी त्यांच्या घरी पाठवले होते. घरी गेल्यानंतर दरवाजा आतून बंद होता.

जगताप यांनी काका अरुण गवळी यांना फोन करुन सांगीतले. इमारतीमधील रहिवाशांच्या मदतीने दरवाजा तोडला असता गौरव आणि नेहा यांनी हाॅलमध्ये सिलिंग फॅनच्या हुकाला सुताच्या दोरीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले.

सावकाराविरोधात गुन्हा

इंदिरानगर पोलिसांनी दोघां‌चे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले असून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. खासगी सावकाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून याप्रकरणाचा सखोल तपास करण्याचे अश्वासन नातेवाईकांना देण्यात आले. दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...