आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिककरांसाठी पुढील महिन्यापासून इंदूर, हैदराबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू हाेणार असून अहमदाबादसाठी दुसरी फ्लाइटही सुरू हाेत आहे. इंडिगाे कंपनीने यासाठी स्लाॅटची मागणी नाेंदविली असून 1 जूनपासून ही सेवा प्रत्यक्षात सुरू हाेण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.
नाशिक विमानतळावरून सध्या नागपूर, अहमदाबाद, गाेवा या मार्गांवर इंडिगाे नियमित सेवा देत असून प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी, मेंटेनन्समुळे फ्लाइटस्च्या उपलब्धतेअभावी स्पाइस जेटकडून अचानक दिल्ली आणि हैदराबादची सेवा स्थगित करण्यात आली हाेती, त्यापैकी जनभावना लक्षात घेत कंपनीने आठवड्यातून तीन दिवस दिल्ली करीता विमानसेवा सुरू केली असली तरी हैदराबादची सेवा बंद आहे. आता इंडिगाे या मार्गावर विमानसेवा देणार असल्याने नाशिककरांची कनेक्टिव्हिटी या शहरांकरिता पुन्हा हाेणार आहे.
त्र्यंबकेश्वर-महाकाल हे प्रमुख कारण
त्र्यंबकेश्वर आणि उज्जैनचे महाकाल यांच्या दर्शनासाठी भाविकांना सुविधा मिळावी, त्यातून बारा तासांचा वेळ वाचावा यासाठी नाशिक-इंदूर विमानसेवा सुरू व्हावी अशी मागणी निमाच्या एव्हिएशन कमेटीचे चेअरमन मनीष रावल यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चाैहान यांच्याकडे केली हाेती. चाैहान यांनी केंद्रीय नागरी विमान उड्डयनमंत्री ज्याेतिरादित्य सिंधिया यांच्याकडे याबाबत मागणी केल्यानंतर ही सुरू हाेत आहे, हे विशेष.
अहमदाबादसाठी दुसरी फ्लाइट; १ जूनपासून सेवेची शक्यता
इंडिगाेकडून अगाेदरच अहमदाबादसाठी विमानसेवा दिली जात आहे, त्यात आता आणखी एका फेरीची भर पडणार असल्याने दिवसातून दाेन वेळा अहमदाबादसाठी विमानसेवा उपलब्ध हाेऊ शकेल. याचा फायदा शिर्डी, त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही हाेणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.