आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निफाड:मद्यधुंद अवस्थेत नागाशी मस्ती करणाऱ्या तरुणाला "नागोबा’ने कला 4 वेळा दंश

निफाडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मद्यधुंद अवस्थेत नागाशी मस्ती करणे निफाड तालुक्यातील नांदूर-मधमेश्वर येथील तरुणाला महागात पडले असून चार वेळा नागाने चावा घेतल्याने या तरुणांची प्रकृती चिंताजनक आहे. नाशिक येथे शासकीय जिल्हा रुग्णालयात संबंधित तरुणावर उपचार सुरू आहेत.

निफाड तालुक्यातील नांदूर-मधमेश्वर येथे मद्यपी मंगेश भाऊसाहेब गायकवाड या तरुणाने जिल्हा परिषद शाळेच्या आवारात नाग दिसताच त्याच्याशी मस्ती सुरू केली. या वेळी ग्रामस्थांनी त्यांची समजूत काढून तेथून बाजूला जाण्यास सांगितले. मात्र, मद्यधुंद अवस्थेत असल्याने ताे कुणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. तो इतका नशेत होता की त्याने अर्धनग्न अवस्थेत नागाशी मस्ती सुरू केली. चिडलेल्या नागाने चार वेळा या तरुणाला चावा घेतला. चावा घेतल्याच्या रागात या तरुणाने नागाला हाताने ठेचून मारण्याचा प्रयत्नही केला. मंगेशची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला निफाडच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. नागाला पकडून वन विभागाने अधिवासात सोडले आहे.

मोलमजुरीवर कुटुंबाची हाेते गुजराण
मंगेश गायकवाड हा नांदूर-मधमेश्वर येथील बेघर वस्तीत राहतो. तो आदिवासी कुटुंबातील असून त्याच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी, १० महिन्यांची छोटी मुलगी आहे. मंगेश, पत्नी व आई-वडील दुसऱ्याच्या शेतावर जाऊन मोलमजुरी करतात. पाच वर्षांपूर्वी त्याचा मोठा भाऊ दिगंबरचा कॅन्सरने मृत्यू झालेला आहे.

बातम्या आणखी आहेत...