आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिर्डीमध्ये सायंकाळी पाच वाजता नियमित लँडिंग होणारे चेन्नई-शिर्डी हे स्पाइस जेट कंपनीच्या विमानाने शनिवारी रात्री साडेआठ वाजता नाशिक विमानतळावर नाईट लँडिंग केले. 26 मे रोजी देखील रात्री साडेदहा वाजता असाच प्रकार घडला होता.
शिर्डीत नाईट लॅंडिंगच नाही
शिर्डीमध्ये नाईट लँडिंगची व्यवस्था नसल्याने, अतिशय जवळ असलेल्या नाशिक विमानतळाचा पर्याय कंपन्या नाईट रायटिंग साठी निवडत आहे. केवळ आठ दिवसांत दुसऱ्यांदा स्पाइस जेटच्या या फ्लाईटने नाशिक मध्ये नाईट लँडिंग केले आहे.
आघाडीच्या स्पाइस जेट विमान कंपनी कडून चेन्नई शिर्डी अशी विमान सेवा नियमित सुरू आहे. या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते.
अजूनही नाशिकचाच पर्याय
चेन्नई -शिर्डी या मार्गावरील या कंपनीच्या सेवेबाबत आधीसारखाच अनुभव विमान प्रवाशांना शनिवारीही आला. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची व्यवस्था नसल्याने नजीकचे विमानतळ म्हणून नाशिक विमानतळाचा पर्याय या फ्लाइट करता निवडण्यात आला. रात्री साडे आठ वाजता शिर्डी ऐवजी नाशिक विमानतळावर या विमानाने लँडिंग केले.
साईभक्तांसाठी बसची सोय
शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांसाठी कंपनीकडूनच बसची व्यवस्था केली गेली तर शिर्डी वरुन चेन्नई साठी विमानाचे तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना याच बसने नाशिक विमानतळावर आणण्यात आले होते, त्यांना चेन्नई करता रात्री याच फ्लाईटने रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आंतरराष्ट्रीय सेवेसाठी नाशिक विमानतळ सज्ज
नाशिक विमानतळ हे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रनवे असलेले विमानतळ मानले जाते. 3200 मीटरचा रनवे असल्याने कोणत्याही प्रकारचे विमान येथे उतरू शकते. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सेवा येथून देण्यासाठी विमानतळ सज्ज झाले असून येथे हज टर्मिनल मधून देखील सेवा दिली जाणार आहे. तर नाईट लँडिंग ची व्यवस्था असल्याने मुंबई विमानतळावरून नाईट पार्किंगसाठी अहमदाबादसाठी जाणाऱ्या विमानांना नाशिक हा उत्तम पर्याय ठरू शकतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.