आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील उद्याेजकांची शिर्ष संघटना असलेल्या नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन (निमा) वर अखेर धर्मादाय सहआयुक्तांनी 21 उद्याेजकांची विश्वस्त म्हणून निवड केली आहे. गुरूवारी सायंकाळी या निवड झालेल्या विश्वस्तांची यादी समाेर आली असून त्यात, निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, किशाेर राठी, आशिष नहार, मनीष रावल आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. माजी अध्यक्ष मंगेश पाटणकर, शशिकांत जाधव यांचा समावेश यादीत नाही.
निमावर विश्वस्त पदासाठी 40 उद्याेजक इच्छुक हाेते, त्यांनी धर्मादाय सहा. आयुक्त कार्यालयाकडे अर्ज दाखल केले हाेते. या सर्वांना 2 ते 4 जानेवारी असे तीन दिवस मुलाखतीसाठी बाेलविण्यात आले हाेते. बुधवारी, 4 जानेवारीपर्यंत 36 उद्याेजकांच्या मुलाखती घेण्यात आल्या हाेत्या. यानंतर अपेक्षेप्रमाणे गुरूवारी निवड झालेल्या विश्वस्तांची यादी समाेर आली आहे. या यादीत तरूण चेहऱ्यांवर विश्वास टाकण्यात आल्याचे स्पष्ट हाेत आहे.
यांची झाली विश्वस्तपदी निवड
धनंजय बेळे, आशिष नहार, जयंत जाेगळेकर, संजय साेनवणे, राजेंद्र वडनेरे, वैभव जाेशी, विरल ठक्कर, राजेेंद्र अहिरे, श्रीधर व्यवहारे, सुकुमारन नायर, किशाेर राठी, गाेविंद झा, सुरेंद्र मिश्रा, संदिप भदाणे, रविंद्र झाेपे, मिलींद राजपुत, सुधीर बडगुजर, जितेंद्र अहेर, हर्षद ब्राम्हणकर, मनिष रावल, नितीन वाघस्कर यांची निवड धर्मादाय सहा. आयुक्त टी.एस.अकाली यांनी निमाचे विश्वस्त, कार्यकारी कमिटी सदस्य म्हणून केली आहे.
उद्याेगवर्तुळातून निवडीचे स्वागत
दरम्यान निमाचे कामकाज पुन्हा पुर्ववत व्हावे याकरीता विश्वस्त निवडीकडे उद्याेजकांचे लक्ष लागून हाेते. बुधवारी मुलाखती संपल्यानंतर लगेचच गुरूवारी ही निवड जाहीर झाल्याने उद्याेगवर्तुळातून तीचे जाेरदार स्वागत हाेत आहे. निवड झालेल्या विश्वस्त मंडळाकडून आता निमाचे कामकाज हाती घेतले जाइल व निमाचे काम पुन्हा उद्याेजकांसाठी खऱ्या अर्थाने सुरू हाेऊ शकेल अशी समाधानाची भावना व्यक्त हाेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.