आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाहतूक समस्या,अतिक्रमण, रस्त्यांच्या खोदकामामुळे उद्भवणाऱ्या समस्या तसेच अवैध धंद्याला आलेले ऊत यासह उद्योजकांना भेडसावणाऱ्या अनेक म्हत्वांच्या मुद्यांवरून निमा हाऊसमध्ये आयोजित बैठक आज गाजली. उद्योजकांच्या प्रश्नांकडे जातीने लक्ष न देणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी चांगलेच धारेवर धरले.
दुहेरी फायरसेसचा प्रश्न मार्गी लागला असून 1 एप्रिलपासून त्याची अमलबजावणी होईल असे महापालिका आयुक्तांनी सांगितले तर अंबड पोलीस ठाण्याचे लवकरच विभाजन होऊन नवीन पोलीस ठाणे निर्माण होईल,असे सूतोवाच पोलीस आयुक्तांनी केले.
जिल्ह्यातील उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यास पालकमंत्रयांच्या सूचनेनुसार महापालिका, पोलीस, महसूल,एमआयडीसी,प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संबंधित सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बुधवारी निमा हाऊस येथे (सातपूर) येथे पार पडली. व्यासपीठावर महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे,सचिव राजेंद्र अहिरे,महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कामगार उपायुक्त विकास माळी,अधीक्षक अभियंता एमआयडीसी बाळासाहेब झांज्जे,जिल्हा उदयोग केंद्र सहसंचालक शैलेंद्र राजपूत,विद्युत मंडळाचे माणिकलाल तपासे आदी होते.
प्रास्ताविक निमा अध्यक्ष बेळे यांनी केले बैठकीचा उद्देश स्पष्ट करतांनाच त्यांनी उधोजकांच्या विविध समस्यांना वाचा फोडली. अंबड औद्योगिक वसाहतीतील दुहेरी फायरसेसचा प्रसन्न मार्गी लागल्याचे आणि एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.सीईपीटी करू.नीरीचा अहवाल आला असेल तर या मुद्यावर पुढे जाऊ अशी घोषणा महापालिका आयुक्त पुलकुंडवार यांनी केली.
सातपुरला शहरात गॅस पाईपलाईन जाळे होणार आहे.चुकीची कामे करू नका असे मोबाइल कंपन्यांना सांगितले आहे.तुमचे काम करतांना दुसऱ्या युटिलिटीला तडे नको असे त्यांना बजावले आहे.सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा.एलबीटीचे परतावे लवकर होतील, असेही ते म्हणाले.जाचक मालमत्ता कराबाबत बोलतांना इंडस्ट्रीयल स्लॅब करू असे आयुक्तांनी सांगितले.सांडपाण्याचा प्रकल्प अमृत-2 मधून घेण्याचा प्रयत्न केला जाईल असे ते म्हणाले
चर्चेत मधुकर ब्राह्मणकर,जयप्रकाश जोशी,सतीश कोठारी,राजेंद्र फड,अतुल भदाणे, यतीन पटेल, संजय सोनवणे,मनीष रावल, बबन चौरे, नितीन आव्हाड, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, समीर पटवा, विनायक गोखले, आदींसह उपस्थित अनेक उद्योजकांनी चर्चेत सहभाग घेतला, सुमारे दोन ते अडीच वर्षानंतर होत असलेल्या बैठकीच्या सूर बघता अनेक उद्योजकांनीही प्रति झूम मीटींगच झाल्याचे यावेळेस बोलून दाखवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.