आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन (निमा) या जवळपास साडेतीन हजार उद्याेजकांची संघटनेवर फिट पर्सन म्हणून काम पहाण्यासाठी धर्मादाय सहाआयुक्त कार्यालयाकडून सुरू असलेल्या इच्छुकांच्या मुलाखती बुधवारी संपल्या. याकरीता ४० इच्छुकांनी अर्ज केले हाेते, त्यांच्यापैकी ३६ उद्याेजकांनी मुलाखती दिल्याची माहीती समाेर येत असून आता नेमकी काेणाची आणि कधी निवड हाेणार? याची उत्सुकता उद्याेगवर्तुळात पहायला मिळत आहे. निमाचे कामकाज उद्याेजकांसाठी म्हणून गेल्या दीड वर्षांपासून जवळपास बंद आहे. त्यामुळे निमाचे कामकाज पूर्ववत सुरू व्हावे अशी उद्याेजकांची भावना आहे. विशेष म्हणजेे, या मुलाखती पूर्ण झाल्याने समाधानाचे वातावरण असून या निवडी झाल्यानंतर याच वर्षात निमाची घटना मंजूर करून घेण्यासह निवडणूक प्रक्रिया पूर्ण हाेइल अशी शक्यता व्यक्त हाेत आहे.
ज्या चार इच्छुकांनी अर्ज भरले हाेते मात्र मुलाखती दिल्या नाहीत त्यात निमाचे एक माजी अध्यक्षांसह नाशिक आयकाॅन म्हणून आेळखल्या जाणाऱ्या एका युवा उद्याेजकाचा समावेश असल्याचे समजते. निमाच्या विश्वस्तपदासाठी धर्मादाय सहायक आयुक्त कार्यालयाकडून सुरू असलेल्या मुलाखतींबाबत उद्याेजकांच्या वर्तुळात उत्सुकता असून याबाबच चर्चा सुरलू आहे. फिट पर्सन काम पाहण्यासाठी नियुक्ती झाल्यानंतर निमाच्या कामकाजाला गती येणार आहे. यामुळे याची प्रतीक्षा आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.