आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नाशिक:निसर्ग चक्रीवादळ निफाड तालुक्यातून गेल्याने दिवसभर अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

लासलगाव2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

निसर्ग चक्रीवादळ निफाड तालुका परिसरातून गेल्याने बुधवारी दिवसभर अतिवृष्टी झाली. वादळी वारे जोरदार वाहिल्याने कांदा व्यापाऱ्यांचे शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

बुधवारी सायंकाळपासून लासलगाव व परिसरात पावसाचा वेग प्रचंड वाढला होता. सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टी सुरू असतानाच लासलगाव कोटमगाव रोडवरील संदीप जगताप व अनिल आब्बड यांचे कांदा शेड या वादळाच्या तडाख्यात सापडले. संदीप जगताप यांच्या कांदा शेडमध्ये सुमारे 20 टन कांदा होता. यासोबतच दोन दुचाकी व बारदान यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन्ही व्यापाऱ्यांचे सुमारे चौदा ते पंधरा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

परिसरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने छोटे मोठे रस्ते बंद पडले होते मात्र स्थानिकांनी मदत करत वृक्ष बाजूला करत  वाट मोकळी करून दिली. अनेक शेतकऱ्यांचा शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला असल्याची दाट शक्यता आहे शेतकरी व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

0