आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचार मांडण्याचा अधिकार राजकारण्यांनी मान्य करावा:केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे वक्तव्य, वर्ध्यातील साहित्य संमेलनाचे वाजले सूप

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूल्य कायम राहिली पाहिजे ती कधीही बदलू शकत नाही. जे जे साहित्य संत वाङमयातून मिळालेले आहे त्या साहित्याचा भावार्थ कधीही बदलू शकत नाही. समाजसुधारणेचा विचार त्यातूून आला आहे. आचरण, वर्तन आणि व्यवहार तसा असायला हवा त्यात जातीयवाद, सांप्रदायीकता, असहिष्णूता त्यात येता कामा नये. सगळ्यांचाच विचार मांडण्याचा अधिकार राजकारण्यांनीही मान्य केलाच पाहिजे, असा संवाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साधला.

वर्धा येथे 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समाराेपाप्रसंगी नितीन गडकरी बाेलत हाेते.

गांधीजी, विनाेबांच्या व्रतस्थ जीवनातून संस्कार मिळाला

नितीन गडकरी म्हणाले की, साहित्य संस्कृतीतून समाज बदलत असताे. त्याचा समाजावर दीर्घकालीन परिणाम हाेत असताे. गांधीजी, विनाेबा भावेंच्या व्रतस्थ जीवनातून त्यांच्या लेखनातून एक संस्कार मिळाला. भविष्य घडवायचे असेल तर त्याची गरज आेळखून त्या अनुशंगाने साहित्यिकांनीही विचार मांडायला हवे. काेणतेही विचार आत्मसात करण्यासाठी नाॅलेज खूप महत्त्वाचे असते.

राजकारण्यांची भूमिका हीच

नितीन गडकरी म्हणाले, साहित्यातून समाजाला जीवनदृष्टी दिली. कधी-कधी लिखाणाचा परिणाम समाजमनावर हाेताे. मराठी साहित्यातच सर्व श्रेष्ठ आहे असे काही नाही तर इतर भाषांतील साहित्यातील साहित्यही बघितले पाहिजे. साहित्यात राजकारण्यांचं काय काम असं म्हटलं जातं. त्यांचं सहकार्य आणि प्रशासनाचं माेलाचं सहकार्य मिळालं त्यासाठी आपण त्यांचा सत्कार केला हीच सरकारची आणि पर्यायाने राजकारण्यांची भूमिका असल्याचेही ते म्हणाले.

..तर गांधींजींचे स्वप्न पूर्ण होईल

साहित्याच्या विचारातून जीवन व्यवहार चालले, मूल्य जपली तर 21व्या शतकातील आणि गांधीजींचं स्वप्नातील राष्ट्रनिर्माण तसेच आत्मनिर्भर भारत घडण्यास मदतच हाेइल असेही ते म्हणाले.

बदलत्या पिढीनुसार बदल व्हावे

आत्मनिर्भर भारत बनवायचा असेल तर आज आपली पिढी काय वाचते ते बघणं महत्त्वाचं ठरेल. प्रत्येकाकडूनच काहीतरी शिकण्यासारखं असल्याने जनरेशन गॅपचा विचार करायलाच हवा. जुन्या पिढीला जे वाटतं तेच नव्या पिढीला वाटेल असं हाेत नाही. त्यामुळे जनरेशन गॅप लक्षात घेऊन डिजीटलद्वारे साहित्य कसे पाेहाेचेल याचा विचार केला पाहिजे. माॅडर्न व्हायला हवे, वेस्टर्ननायेशन हाेता कामा नये.

डीजिटलसाठी गडकरींचे काम

यावेळी भाषणात गडकरी म्हणाले की, मी स्वत: ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, ग्रामगीता आणि संत गजानन महाराजांची पाेथी डिजीटल करत आहे. त्यातील गजानन महाराजांची पाेथी पूर्ण ‌झाली आहे. उर्वरित कामही पूर्ण हाेण्याच्या मार्गावर आहे.

वाद झाला नाही हे बरे झाले

साहित्य संमेलन म्हटलं की, त्याला काेणत्या ना काेणत्या वादाची किनार असते. वर्ध्यातील संमेलन मात्र काेणत्यही वादाविना झाले हे एक चांगले आहे. त्याचा खूप आनंद झाला आहे. असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...