आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:निझामाबाद-पुणे एक्स्प्रेस 1 ते 26 मार्चदरम्यान रद्द

मनमाड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड-दौंड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या अंतर्गत बेलापूर, चितळी, पुणतांबा स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉक कामाचे नियोजन करण्यात आले आहे. या कामामुळे रेल्वेच्या काही महत्त्वपूर्ण प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मनमाड-नगर-दौंड-पुणे तसेच भुसावळ व परप्रांतात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. दौंड-निझामाबाद एक्स्प्रेस १ ते २४ मार्चदरम्यान रद्द करण्यात आली आहे. निझामाबाद-पुणे एक्स्प्रेस १ ते २६ मार्चदरम्यान रद्द करण्यात आल्याचे कळवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...