आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुका:कॉलेज इलेक्शन नाही आम्हीच नेमू प्रतिनिधी ; महाराष्ट्र स्टुडंटस युनियनचा स्वतंत्र बाणा

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत ३० वर्षांपासून बंद पडलेल्या महाविद्यालयीन निवडणुकांमुळे सर्वसामान्य गरीब अन् राजकीय वारसा नसलेल्या तरुणांचे राजकारणातील प्रतिनिधित्व कमी होत आहे. दुसरीकडे प्रतिनिधी नसल्याने विद्यार्थ्यांच्या समस्याही सुटत नाही. वारंवार शासनाला सांगूनही या निवडणुका होत नसल्याने विद्यार्थीहितासाठी महाराष्ट्र स्टुटंड्स युनियन (मासू) राज्यातील १८ विद्यापीठे आणि सर्वच महाविद्यालयांत आपले प्रतिनिधी नियुक्त करणार आहेत.

विद्यापीठ अध्यक्ष व महाविद्यालय जनरल सेक्रेटरी (जी. एस.) यांच्यासह महिला प्रतिनिधी (एल.आर.) आणि महाविद्यालयांच्या क्षमतेनुसार २ ते ४ सदस्य असे एकूण ५ ते ७ प्रतिनिधींची नियुक्ती संघटनेच्या पातळीवर केली जाईल.

कल्याणपासून प्रारंभ
महाविद्यालयीन प्रतिनिधी नियुक्त करण्याची सुरुवात कल्याणच्या महाविद्यालयापासून झाली आहे. - ॲड. सिद्धार्थ इंगळे, अध्यक्ष (मासू)

बातम्या आणखी आहेत...