आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुसफूस:भाजप नाशिकचा शहराध्यक्ष बदलासाठी मुंबईतील निरीक्षकांची ‘वन टू वन’ चर्चा, नगरसेवकांमधून नियुक्तीस विराेध

नाशिक‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाेन वेळा शहराध्यक्षपदाची सूत्रे ‎ मिळाल्यानंतर चमक दाखवू न ‎शकलेल्या भाजप शहराध्यक्ष गिरीश ‎ ‎ पालवे यांच्या जागी नवीन चेहरा ‎ देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर ‎बावनकुळे यांनी मुंबईतून पक्षाच्या ‎ ‎ सरचिटणीस माधवी नाईक यांना ‎ निरीक्षक म्हणून पाठविले. त्यांनी ‎ मंगळवारी (दि. ९) तिन्ही अामदार, ‎ माजी नगरसेवकांसह प्रमुख ‎ पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. ‎ ‎

यावेळी माजी नगरसेवकांमधून ‎ ‎शहराध्यक्ष करण्यास प्रमुख ‎ पदाधिकाऱ्यांसह ज्येष्ठांनी विराेध ‎ ‎ केल्याने अंतर्गत धुसफूस दिसून ‎ ‎ अाल्याचे वृत्त अाहे. नगरसेवकांनी ‎ ‎ निवडणूक लढवावी तर संघटनेतील ‎ ‎ निष्ठावंतांना संघटनात्मक‎ जबाबदारीत बढती द्यावी, अशी‎ मागणी केल्याचे सांगितले जाते.‎ भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी‎ चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‎ नियुक्तीनंतर शहर व जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग‎ अाला.

मात्र निर्णय काही हाेत नव्हता.‎ त्यामुळे पक्षातील अस्वस्थता वाढत हाेती.‎ काही दिवसांपूर्वीच प्रदेश कार्यकारणीचा‎ विस्तार झाल्यानंतर राज्यातील अनेक‎ ठिकाणी खांदेपालट हाेईल असे संकेत‎ बावनकुळेंननी दिले हाेते. त्यानुसार नाशिक‎ भाजप शहराध्यक्ष बदलासाठी पक्षांतर्गत‎ कानाेसा घेण्यासाठी नाईक यांनी दिवसभर‎ पक्षाच्या ‘वसंतस्मृती’ कार्यालयात मते‎ जाणून घेतली.‎

राज्यात जून महिन्यात सत्ता येवून भाजपाचा विस्तार झाला नाही. याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिक बळकटी मिळाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने तर भाजपलाच सुरूंग लावला. दुसरीकडे, भाजपतील अंतर्गत कलह थांबवण्यात शहराध्यक्षांना यश अाले नाही.

दरम्यान, बावनकुळे यांच्या नियुक्तीनंतर शहर व जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग अाला. मात्र निर्णय काही हाेत नव्हता. त्यामुळे अस्वस्थता वाढत हाेती. काही दिवसांपूर्वीच प्रदेश कार्यकारिणीचा विस्तार झाल्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी खांदेपालट हाेईल, असे संकेत बावनकुळे यांनी दिले हाेते. त्यानुसार नाशिक भाजप शहराध्यक्ष बदलासाठी पक्षांतर्गत कानाेसा घेण्यासाठी नाईक यांनी दिवसभर पक्षाच्या ‘वसंतस्मृती’ या कार्यालयात ठाण मांडले.

संघटना विरूद्ध लाेकप्रतिनिधींमध्ये सुप्त चढाअाेढ

सर्व काही लाेकप्रतिनिधींनाच असा कल्लाेळ भाजपात सुरू अाहे. निवडणूक अाली की त्यांना किंवा कुटुंबातील व्यक्तींना तिकिट, निवडणूक नसली की त्यांची साेय म्हणून संघटनेतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अाणि सामान्य निष्ठावंताकडे सतरंज्या उचलण्याची जबाबदारी, असे किती दिवस चालणार असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे.

संघटनेतून सुनील केदार, प्रशांत जाधव, नाना शिलेदार, अनिल भालेराव, उत्तम उगले, अाशिष नहार, देवदत्त जाेशी यांच्यासारख्यांना बढती मिळण्याची अपेक्षा अाहे. दुसरीकडे, नगरसेवकांमधून गणेश गिते, हिमगाैरी अाहेर अाडके, मुकेश शहाणे, संभाजी माेरूस्कर, अरूण पवार, जगदीश पाटील यांची नावे चर्चेत अाहेत.

पंधरा दिवसात नवीन कारभारी

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भाजप प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. त्यामुळे अाता शहर व जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग अाला अाहे. साधारण पंधरा दिवसात वा कर्नाटक निवडणुकीनंतर भाजप शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष बदलाबाबत निर्णय हाेवू शकताे.

‘ताे’ ठेकेदार पुन्हा कार्यरत

भाजपतील काही माजी नगरसेवकांना शहराध्यक्षपद मिळवून देताे असे सांगत बावनकुळे व पक्षाचे प्रभारी गिरीश महाजन यांच्याकडे लाॅबिंग करून देताे,असे सांगणारा ठेकेदार पुन्हा कार्यरत झाल्याची चर्चा अाहे. प्रदेश अधिवेशनानंतर अापली ‘किंमत’ वाढल्याचे सांगत त्याच्याकडून संघटनेत सुरू झालेल्या हस्तक्षेपाबाबतही पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी झाल्याचे सांगितले जाते.

पालवेंची मुदतवाढीसाठी धडपड

पालवे यांना तिसऱ्यांदा मुदतवाढीचे वेध‎ लागले अाहेत. त्यामुळे त्यांनीही नाईक यांच्या‎ दाैऱ्याच्यापार्श्वभू मीवर काही‎ पदाधिकाऱ्यांकडे माझ्या मुदतवाढीसाठी‎ शिफारस करा अशी मिन्नतवारी केल्याचे‎ समजते. दरम्यान, माजी‎ नगरसेवकांनी एकसुरात पालवे अाता नकाे‎ असे सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे.‎

संघटना विरुद्ध लाेकप्रतिनिधी

सर्व‎ काही लाेकप्रतिनिधींनाच असा कल्लाेळ‎ भाजपात सुरू अाहे. निवडणूक अाली की‎ त्यांना किंवा कुटुंबातील व्यक्तींना तिकीट,‎ निवडणूक नसली की त्यांची साेय म्हणून‎ संघटनेतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अाणि‎ सामान्य निष्ठावंताकडे सतरंजा उचलण्याची‎ जबाबदारी असे किती दिवस चालणार?‎ असा सुरू निष्ठावंतांमध्ये उमटत अाहे.‎ संघटनेतून सुनील केदार, प्रशांत जाधव,‎ नाना शिलेदार, अनिल भालेराव, उत्तम‎ उगले, अाशीष नहार, देवदत्त जाेशी‎ यांच्यासारख्यांना बढती मिळण्याची अपेक्षा‎ अाहे. दुसरीकडे, नगरसेवकांमधून गणेश‎ गिते, हिमगाैरी अाहेर अाडके, मुकेश‎ शहाणे, संभाजी माेरूस्कर, अरूण पवार,‎ जगदीश पाटील यांची नावे‎ शहराध्यक्षपदासाठी चर्चेत अाहे.‎

‘ताे’ ठेकेदार कार्यरत‎

भाजपतील काही माजी‎ नगरसेवकांना शहराध्यक्षपद‎ मिळवून देताे असे सांगत बावनकुळे‎ व पक्षाचे प्रभारी गिरीश महाजन‎ यांच्याकडे लाॅबिंग करून देताे असे‎ सांगणारा ठेकेदार पुन्हा कार्यरत‎ झाल्याची चर्चा अाहे. प्रदेश‎ अधिवेशनानंतर अापली ‘किंमत’‎ वाढल्याचे सांगत त्याच्या‎ हस्तक्षेपाबाबतही पक्षश्रेष्ठींकडे‎ तक्रारी झाल्याचे सांगितले जाते.

१५ दिवसांत नवा कारभारी‎‎

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भाजप‎ प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर‎ केली. त्यामुळे अाता शहर व‎ जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचालींना‎ वेग अाला अाहे. साधारण पंधरा‎ दिवसांत वा कर्नाटक‎ निवडणुकीनंतर भाजप शहराध्यक्ष व‎ जिल्हाध्यक्ष बदलाबाबत निर्णय हाेऊ‎ शकताे, असे सूत्रांनी सांगितले.‎