आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नो हेल्मेट - नो पेट्रोल':नाशकात आजपासून हेल्मेटधारकांनाच मिळणार पेट्रोल, अपघाती मृतांची संख्या कमी करण्यासाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आजपासून शहरात ‘नो हेल्मेट - नो पेट्रोल’ उपक्रम राबवणार आहेत. 'सर सलामत, तो हेल्मेट पचास' यानुसार स्वत:च्या सुरक्षेसाठी नागरीकांनी हेल्मेट वापरून या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

पोलीस आयुक्त दीपक पांण्डेय यांच्या संकल्पनेतून 'नो हेल्मेट नो पेट्रोल' हा उपक्रम पुढे आला आहे. पेट्रोल पंप चालकांच्या संमतीने हा उपक्रम शहर पोलिसांनी हाती घेतला असून त्याचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनापासून करण्यात आला आहे. यामुळे आता पेट्रोल पंपावर हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनाच पेट्रोल मिळू शकणार आहे.

शहरात नो हेल्मेट नो पेट्रोल मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे पेट्रोल पंपांवर बॅनर लावण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...