आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरवठा:जिल्ह्यातील 76 पंपांवर ‘नो पेट्रोल, नो डिझेल’ ; तीन दिवसांत पुरवठा होणार सुरळीत

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (दि. २) ४६५ पैकी ३८९ म्हणजे ८४ टक्के पंपांवर इंधन पुरवठा सुरळीत झाला. तर ७६ पं‍पांवर इंधन तुटवडा बघायला मिळत आहे. सर्वाधिक ५५ बंद पंप हे भारत पेट्रोलियमचे (बीपीसीएल) आहेत. त्याखालोखाल हिंदुस्तान पेट्रोलियमचे १४ व इंडियन ऑइलच्या ७ पंपांवर डिझेल नाही. दरम्यान, पुढील तीन दिवसांत इंधन पुरवठा स्थिती सुरळीत होईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली. इंधन खरेदी आंदोलनानंतर शहर व जिल्ह्यातील पंपांवर इंधनाचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. बुधवारी (दि. १) तर बहुतांश पंप इंधन नसल्याने बंद होते. तर गुरुवारी हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आली. सद्यस्थितीत ८४ टक्के पंप सुरू झाले आहेत. मात्र, सर्वाधिक समस्या ही भारत पेट्रोलियमच्या पंपांवर दिसत आहे. तिन्ही कंपन्यांमध्ये सर्वाधिक ४६५ पैकी १७६ पंप हे बीपीसीएल कंपनीचे आहे.

कंपन्यांचे साठा असूनही इंधन विक्रीवर निर्बंध : लोध इंधन दरावरील अबकारी कर केंद्र व राज्य शासनाने कमी केल्याने सध्या लिटरमागे सुमारे १० रुपयांनी कमी झाले आहेत, मात्र हे मृगजळ ठरणार असल्याची प्रतिक्रिया पेट्रोलियम कंपन्यांच्या डीलर्सनी व्यक्त केली आहे.कंपन्यांना डिझेल व पेट्रोल दरात १५ ते २० रुपये अशी वाढ हवी आहे, परंतु पेट्रोलियम मंत्रालय ती करू देत नाही, त्यामुळे कंपन्यांनी पुरेसा साठा असूनही रेशनिंग पद्धत लागू करीत इंधन विक्रीवर निर्बंध आणले आहेत, हे चुकीचे असल्याचा आरोप फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन (फामपेडा)चे अध्यक्ष उदय लोध यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...